डोकेदुखी, अर्धडोकेदुखी वर रामबाण उपाय Dokedukhi

डोकेदुखी,अर्ध डोकेदुखी वर रामबाण उपाय.

डोकेदुखीची समस्या सर्वांसाठीच आहे.डोके दुखले की आपण औषधांचा वापर करतो. पण सततच्या डोकेदुखीवर आपण किती गोळ्या घेणार.तीव्र डोकेदुखी वर आयुर्वेदामध्ये अनेक उपाय आहेत.आयुर्वेदामध्ये तुळस या वनस्पतीला गुणकारी मानले जाते.तुळस सर्वत्र उपलब्ध असते तुळशीच्या पानांमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे अनेक समस्या दूर होतात.डोकेदुखी या समस्यावर सुद्धा तुळस गुणकारी ठरली आहे.

डोकेदुखी, अर्धडोकेदुखी वर रामबाण उपाय Dokedukhi

सर्वप्रथम तुळशीचे चार ते पाच पाने घेऊन ही पाने मिठाच्या पाण्यामध्ये साधारणत पाच ते सहा मिनिटे भिजत ठेवा, नंतर हे तुळशीची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. पाण्यात धुवून घेतल्यानंतर ही पाने एका वाटीमध्ये ठेवा.घेतलेले पानेही हाताने चोडून घ्या चोडल्यानंतर स्वच्छ पांढऱ्या कापडामधून त्याचा रस काढून घ्या.अर्धा चमचा रस निघेल या प्रमाणात तुळशीचे पाने घ्यावी. अर्धा चमचा काढलेला रस हा पिऊन घ्या. लगेच आराम मिळेल. तीव्र डोकेदुखी जर असेल तर तुळशीचे आठ ते दहा पाने घ्यावी.

अर्ध डोकेदुखी वर रामबाण उपाय

अर्धा डोकेदुखीची अनेकांना समस्या असते. दवाखान्यातील गोळ्या खाऊन सुद्धा अर्ध डोकेदुखी ची समस्या सुटत नाही,तात्पुरत्या स्वरूपात हा त्रास कमी होतो पण गोळ्या किती घेणार. अर्धडोकेदुखी पासून सुटका मिळवायचे असेल तर हा उपाय निश्चितच करा. बाजारामध्ये पेरू मिळतात. हिरव्या कलरचा पेरू घेऊन हा पेरू दगडावर किंवा इतर साहित्य असेल तर त्यावर किसून घ्या. किसून घेतल्यावर त्याची पेस्ट साधारणतः अर्धा चमचा होईल याप्रमाणे पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याचा जो भाग दुखत असेल त्या जागी साधारणतः 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. ज्यामुळे अर्धा डोके दुखीचा त्रास कमी होईल.

Leave a Comment

x