सहकार मित्र इंटर्नशिप योजना
कृषी व कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना 2021 सुरू केली आहे. नोकरी पूर्वी कोणत्याही कंपनीत इंटरंशिप किंवा प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून इंटरंशिप दरम्यान त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते या इंटरंशिप किंवा प्रशिक्षण कालावधीत व्यक्तीला पैसे कमवण्याची संधी मिळाव्यात या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
सहकार मित्र इंटर्नशिप योजना Digital India Internship Scheme 2021
कंपनी इंटर्नशीप दरम्यान मासिक वेतन देऊ करत नाहीत. यामुळे गरीब बेरोजगारांना इंटर्शिप दरम्यान आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.त्यामुळे राष्ट्रीय सहकार महामंडळाने सदर योजना सुरु केली आहे. ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी किमान चार महिने मासिक पेमेंटचा इंटरंशिप साठी ठेवले जाईल.
आपल्या देशात कुशल लोकांची कमतरता आहे. ज्यामुळे बेरोजगारांना लवकर रोजगार मिळू शकत नाही. या लोकांना प्रशिक्षण तसेच कमाईच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर युवकांमध्ये कौशल्य वाढविण्यास मदत होऊन देशातील बेरोजगारांची संख्या कमी होऊ शकते. आपल्या देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे या वेळी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे.सहकार मित्र योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील तरुणांना विविध क्षेत्रात व प्रशिक्षण देऊन पुढे जाण्यास मदत करेल यासाठी तरुणांना इंटर्शिप तसेच चार महिने मासिक पगाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्वालंबी भारत मोहिमेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सरकार मित्र योजनेच्या अंमलबजावणी द्वारे केले जाते
सहकार मित्र योजना 2021 क्षेत्र
1 शेती व संबंधित क्षेत्र 2 आयटी 3 प्रकल्प व्यवस्थापन 4 वित्त 5 आंतरराष्ट्रीय व्यापार 6 सहकार्य 7 वनीकरण 8 ग्रामीण विकास 9 प्रकल्प व्यवस्थापक
या योजनेचा लाभ घेतल्यास पुढील फायदे मिळतात देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतिल. इंटर्शिप चा कालावधी समाप्त झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल. या योजनेतून देशातील तरुणांना युवकांना सक्षम केले जाईल. तरुणांसाठी व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढवला जाईल. योजनेअंतर्गत इंटर्शिप दरम्यान युवकांना आर्थिक मदत दिली जाईल.
पात्रता व कागदपत्रे
1 या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक घेऊ शकतात त्यासाठी इतर कोणत्याही राष्ट्राची व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही.
2 या योजनेसाठी कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे किंवा प्रशिक्षण पूर्ण केले आहेत ते देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात 3 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कृषी आणि संबंधित क्षेत्रातील आणि आयटी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतात
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, ईमेल आयडी,वय प्रमाणपत्र,मोबाईल नंबर
सहकार मित्र इंटरंशिप योजना 2021 ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सहकार मित्र योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल त्याची लिंक खाली दिली आहे
http://sip. ncdc. in/
यानंतर वेबसाईट चे मुखपृष्ठ आपल्यासमोर उघडेल वेबसाईटच्या मुखपृष्ठावर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागले त्यानंतर आपल्या समोरील एक नवीन पानावर आपल्याला एक फॉर्म दिसेल तो फॉर्म भरून आपल्याला सबमिट करायचा आहे.