हे पदार्थ आहेत मधुमेहाचे मोठे शत्रू जाणून घ्या Diabetes

हे पदार्थ आहेत मधुमेहाचे मोठे शत्रू जाणून घ्या.

मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह कमी असला तरी त्रासदायक आणि जास्त असला तरी त्रासदायक आहे. मधुमेह रुग्णाला काही पदार्थ पासून त्यांना लांब राहणे आवश्यक आहे. तसेच मधुमेहाचा त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये आरोग्यदायी आहार व वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.मधुमेह रुग्णांनी या पदार्थां पासून दूरच राहावे.

हे पदार्थ आहेत मधुमेहाचे मोठे शत्रू जाणून घ्या Diabetes

1)मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करने टाळावे.

2) मधुमेहाच्या रुग्णांनी सर्वप्रथम गोड खाणे बंद केले पाहिजे. चॉकलेट,जास्त गोड पदार्थ, बिस्किटे, डबाबंद फळे अजिबात खाऊ नये.

3) साखर असल्यावर गोड खाऊ नये तसेच मिठ देखील कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे.

4) मधुमेही रुग्णांनी सुके मेवे उदारणार्थ बदाम चे सेवन करू नये यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानीकारक ठरू शकते.

5)मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाऊ नये किंवा अतिशय कमी प्रमाणात सेवन करावे. पिकलेल्या आंब्याचे 25 ते 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते म्हणून आंबा खाणे टाळावे.

6) मधुमेह नियंत्रित करण्यासाठी अनेकदा कारल्याच्या रसाचे सेवन केले जाते. जर आपली साखर आधीपासूनच कमी आहे तर आपण कारल्याचा रस सेवन करू नये.

7)मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारामध्ये योग्य तो सकस आहार घेणे आवश्यक असते.

आहारमध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी करावे तसेच वैद्यकीय तपासणी मध्ये साखर तपासून घ्यावी यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.साखर जास्त प्रमाणात वाढत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

x