दही उन्हाळ्यात आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही आपल्या आहारात दह्याचा Curd समावेश केला तर ते आरोग्यासाठी आणि सोंदर्यसाठी फायदेशीर ठरू शकते. दही मध्ये प्रथिने, कॅल्शियम,रायबोप्लेविन, विटामिन बी 6 आणि विटामिन बी 12 सारखी पोषक तत्वे आहेत. चेहऱ्यासाठी दही वापरल्यास सनबर्न, मुरूम, डाग आणि कोरडी त्वचा आणि सुरकुत्या दूर होतात. दही थंड आहे त्यामुळे ते गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून मुक्तता देते तसेच पचनक्रिया सुधारते.
उन्हाळ्यात दही आरोग्यासाठी आणि सौंदर्यसाठी फायदेशीर Curd Dahee
1) जर आपण दररोज दह्याचे Curd सेवन केले तर शरीराला नुकसान करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.बॅक्टेरिया नष्ट झाल्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
2) आपण दररोज दह्याचे सेवन केल्यास आपल्या शरीरात खराब कोलेस्टरॉल तयार होऊ शकत नाही. या शिवाय हे रक्तदाब नियंत्रित करते.
3) पोटासाठी दही खाने फायदेशीर मानले जाते. दही आपले पचन योग्य ठेवण्यास मदत करते गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून देखिल मुक्त होते.
४)दही खाण्याने शरीराचे वजन कमी करण्यास खूप मदत होते. दही सेवन केल्याने आपल्याला जास्त काळ भूक लागणार नाही जे वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते.
5) दह्याचे सेवन केल्याने हाडांचा त्रास कमी होतो आणि हाडे मजबूत होतात दह्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम प्रथिने आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात जे हाडांच्या खजिना ची घनता वाढवतात आणि हाडे मजबूत करतात.
6) चेहऱ्यावरील मुरमाचे डाग दूर करण्यासाठी अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा दह्यामध्ये मिसळा हि पेस्ट आपल्या चेहर्यावर पंधरा मिनिटे ठेवा आणि आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर चार चमचे दहा मध्ये एक चमचा मध मिसळून आता हे मिश्रण फेसपॅक म्हणून लावा सुमारे वीस मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.