आता व्हाट्सअप वर सेकंदात मिळवा कोविड लसीकरण सर्टिफिकेट
केंद्रसरकारने कोविड लसीकरण सर्टिफिकेट नागरिकांना काही अडचण येऊ न देता प्राप्त करून देण्यासाठी Mygov corona Help desk नंबर जारी केला आहे. या नंबर च्या आधारे आपण आपल्या व्हाट्सअप वर एका सेकंदात कोविड लसीकरण सर्टिफिकेट मिळू शकता.
आता व्हाट्सअप वर सेकंदात मिळवा कोविड लसीकरण सर्टिफिकेट Covid Certificate
बऱ्याच नागरिकांचे लसीकरण झाले आहे परंतु अद्याप पर्यंत covid लसीकरण सर्टिफिकेट काढले नाही किंवा काही अडचणी येत आहेत.cowin app वरून सर्टिफिकेट डाऊनलोड केले जातात पण त्यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण येत आहेत आता ही अडचण दूर झाली आहे. शाळा-कॉलेज कामाच्या ठिकाणी, सरकारी किंवा खाजगी नोकरवर्ग, कंपनी मध्ये काम करणारे वर्कर्स, यांना सर्टिफिकेट अनिवार्य झाले आहे. तसेच पपरदेशात प्रवास करणे यासाठी सुद्धा अनिवार्य आहे. आता मिळवा एका सेकंदात सर्टिफिकेट ते सुद्धा आपल्या व्हाट्सअप वर.
प्रक्रिया जाणून घ्या
1 अँड्रॉइड मोबाईल मध्ये माय गव्हर्मेंट कोरोना हेल्पडेस्क 9013151515 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव करा
2 नंतर व्हाट्सअप मेसेज मध्ये सर्टिफिकेट हा शब्द टाईप करा आणि सेंड करा
3 आपल्या मोबाईल नंबर वर 6 अंकी otp ओटीपी येईल ओटीपी टाईप करून सेंड करा
अशा प्रकारे आपल्याला आपल्या व्हाट्सअप वर आपले कोविड लसीकरण सर्टिफिकेट पीडीएफ मध्ये येईल तिथून तुम्ही प्रिंट सुद्धा करु शकता.