कोरोना व्हक्सीन घेतल्यानंतर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका Covid-19 Vaccine

कोरोना व्हक्सीन घेतली असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका?

Covid-19 Vaccine नागरिकांनी लसीचे दोन्ही डोज घेणे आवश्यक असून दोन्ही डोस घेतले तरच या लसीचा फायदा मिळणार आहे.आपण देखील कोरोना व्हक्सीन घेतली असेल किंवा घेणार असाल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

कोरोना व्हक्सीन घेतल्यानंतर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका Covid-19 Vaccine

1) व्हक्सीन घेण्यापूर्वी आपल्याला औषधांचे किंवा इतर पदार्थांची ऍलर्जी असल्यास डॉक्टरांना त्याबद्दल सांगा.व्हक्सीन घेतल्यानंतर काही वेळ डॉक्टरांच्या संपर्कात राहा.कुठलीही अस्वस्थता जाणवल्यास लगेच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

2) व्हक्सीन घेतल्यानंतरही मास लावणे अतिआवश्यक आहे. Covid-19 Vaccine दोन्ही डोज शरीरात गेल्यानंतर अँटीबॉडी तयार होतात अशात जर निष्काळजीपणा केल्यास महागात पडू शकते.

3) व्हक्सीन घेतल्यानंतर लगेच कामावर जाऊ नका. व्हक्सीन घेतल्यानंतर किमान दोन ते तीन दिवस शरीराला आराम द्यावा. अनेक लोकांना लसीकरणानंतर सौम्य असे साइड इफेक्ट जाणवत आहे तेव्हा आरोग्याकडे लक्ष द्या.

4) व्हक्सीन घेतल्यानंतर गर्दीत जाणे व प्रवास करणे टाळा. व्हक्सीन घेतल्यानंतर आपण सुरक्षित आहोत असे वाटत असेल, परंतु दोन्ही डोस जोपर्यंत घेतले जात नाही,तोपर्यंत प्रोटॉकल पाळणे आवश्यक आहे.

5)व्हक्सीन घेतल्यानंतर मद्यपान, सिगारेटचे व्यसन टाळा. आहारामध्ये फळे भाज्या यांचा समावेश करा. उन्हाळा असल्यामुळे भरपूर पाणी प्यावे, तसेच मसालेदार व तेलकट पदार्थांचे सेवन देखील टाळावे. योग्य ठरेल

Leave a Comment

x