कोविड 19 लसीकरणाला घाबरत असाल तर जाणूनच घ्या लसीकरणाची 5 फायदे Covid 19 Vaccination

कोविड-19 लसीकरणाला घाबरत असाल तर जाणूनच घ्या लसीकरणाचे 5 फायदे

कोरोना वायरस च्या दुसऱ्या स्ट्रेन ने थैमान मांडला आहे. कोरोनाव्हायरस चा प्रभाव पूर्वी पेक्षा जास्त वेगाने घराघरात जाऊन पोहोचला आहे. कोरोना ला रोखायचे असेल तर व्हक्सीन लावून घेणे हाच एक उपाय किंवा पर्याय आपल्यासमोर आहे.Covid 19 Vaccination व्हक्सीन बद्दल अनेक समज गैरसमज असतील,सुरक्षितेसाठी व्हक्सीन घेणे काळाची गरज.व्हक्सीन लावून घेण्याचे फायदे जाणून आपल्या मनातील शंका दूर होतील.

कोविड 19 लसीकरणाला घाबरत असाल तर जाणूनच घ्या लसीकरणाची 5 फायदे Covid 19 Vaccination

1)व्हक्सीन लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर आपल्याला संसर्ग झाला नसेल तर आधीपासून आपली इम्युनिटी वाढेल. व्हक्सीन एक द्रवपदार्थ असून शरीरात गेल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

2)व्हक्सीन लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपली इम्युन सिस्टिम कमकुवत असल्यास हे एका बूस्टर प्रमाणे कार्य करेल. ज्याने व्हायरस शरीरात पसरण्या पासून बचाव होते.

3)व्हक्सीन चा एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस न विसरता घेणे आवश्यक आहे.व्हक्सीन लावल्यानंतर पहिला डोस नंतर आपल्याला संसर्ग झाल्यावर घाबरण्याची गरज नाही अशा वेळी शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली असते. कोरोना मुक्त झाल्यानंतर एक महिन्यानंतर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने दुसरा डोस देऊ शकता.

4)व्हक्सीन घेतल्यानंतर सहा ते आठ महिन्यापर्यंत आपल्यात अँटीबॉडीज राहतात त्याने शरीरात व्हायरसचा अधिक प्रभावी होत नाही. लागण होण्यापूर्वीच आपण लस घेतली असेल तर रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही.

5)व्हक्सीन लावण्याचा आपलाच फायदा आहे. याने रुग्णालयात चकरा लावण्याची गरज भासणार नाही. संसर्ग झाला तरी होम आयसोलेट होऊ शकता यासाठी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. आहे ना व्हक्सीन लावण्याचे फायदे.

Leave a Comment

x