कोरोना ची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक.. अशी घ्यावी काळजी Coronavirus

कोरोना ची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक अशा वेळी कोणती काळजी/दक्षता घ्यावी.

Coronavirus सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे.दुसरी लाट ओसरण्याचे संकेत दिले असले तरी, सर्वांना तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागणार आहे.तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया बालरोगतज्ञ यांनी दिली आहे. कोरोना च्या पहिल्या लाटेचे आणि दुसऱ्या लाटेची लक्षणे वेगवेगळे आहेत.अशातच तिसरी लाट येणार म्हटल्याने लक्षणानुसार लहान मुलांची खूप काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून बालकांना कोरोना चा संसर्ग होणार नाही.प्रौढमध्ये लसीकरण सुरू झाले असून लहान मुलांमध्ये लस देण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. लसीकरणामुळे प्रौढ मध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ शकते तर लहान मुलांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. तेव्हा बालरोगतज्ञांच्या मतानुसार लहान मुलांची अशी घ्या काळजी.

कोरोना ची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक.. अशी घ्यावी काळजी Coronavirus

1) लहान मुलांनी सॅनिटायझर चा वापर करणे आणि साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे.

2) अस्वच्छ हाताने आपले डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका याबाबत वारंवार आपल्या मुलांना सांगावे. जर आपण वारंवार स्पर्श केला तर विषाणू संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

3) खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल किंवा टिशू पेपर धरावा पुन्हा पुन्हा न वापरता त्वरित तो कचराकुंडीत टाकून द्यावा.

4) घरात जर कोणी आजारी असेल तर लहान मुलांना दूर ठेवावे कमीत कमी तीन फूट अंतर ठेवून बोलावे. लहान मुलांना ताप,सर्दी,खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व उपचारास विलंब करू नये.

5) लहान बालकांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चुकवू नये, काही कारणास्तव विलंब होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6) मुलांना योग, प्राणायाम,घरगुती खेळ, वाचन, यामध्ये व्यस्त ठेवा. मुलांना सतत एकाच जागी बसून न ठेवता त्यांच्या शारीरिक हालचाली वाढऊन त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा.

7)वैयक्तिक स्वच्छतेबाबत मुलांना वारंवार सूचना द्याव्या.मुलांच्या प्रत्येक हालचाली म्हणजेच आरोग्य यावर लक्ष ठेवा.

8)लहान मुलांना सकस आहार द्यावा या गोष्टींचे जर आपण पालन केले तर मुलांना संसर्ग होण्याचा धोका आपण टाळू शकतो.

Leave a Comment

x