उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरणला प्रारंभ Corona Vaccine

उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ

आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस फक्त 45 वर्षावरील नागरिकांसाठी उपलब्ध होती. परंतु राज्यभरात 18 वर्षावरील सर्वांसाठीच कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले असून 23 जून पासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 45 वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुद्धा सुरू राहील.

उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरणला प्रारंभ Corona Vaccine

दोन दिवसांपूर्वी शासनाने 30 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती. त्यामुळे लसीकरण मोहिमेला पुन्हा वेग मिळणार असल्याचे चित्र दिसून येत असतानाच 18 वर्षावरील सर्वांचेच लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्याचे निर्देश सोमवारी सायंकाळी आरोग्य विभागाला मिळाले. त्यानुसार 23 जून पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार केली जाणार असून मंगळवारी सायंकाळी सात वाजता च्या सुमारास कोविन संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग साठी स्लॉट टाकले जाणार आहेत.

महापालिका व जिल्ह्यातील इतर केंद्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लसीकरणा Corona Vaccine सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. पंचेचाळीस वर्षावरील नागरिकां मध्ये लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे आता 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार असल्याने मंदावलेला वेग वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मोठ्या प्रमाणात असलेला युवावर्ग लसीकरणासाठी उत्सुक असून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

x