आज पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू
कोरोना लसीकरणाबाबत एक सुखद बातमी आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. बरेच दिवसापासून 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण सुरू व्हावे यासाठी शासन प्रयत्नरत होते. शेवटी लसीकरणाबाबत निर्णय झाला.
आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू Corona Vaccination
आज पासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शनिवार दिनांक 19 जून पासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे.त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे असा राजेश टोपे यांनी सांगितले आहे. कोरोना ची दुसरी लाट ओसरत असून बरेच जिल्हे कोरोनाची रुग्ण संख्या पाहता लॉकडाऊन किंवा कळक नियमावलीत बसत आहेत. लाट ओसरली असले तरी दक्षता घेणे काळाची गरज आहे.मास लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात धुणे या नियमांचे पालन करावेच लागेल. तज्ञा नुसार सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागणार आहे. तिसरा लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचे संकेत मिळालेले आहेत त्यामुळे लहान मुलांचे काळजी घेणे आवश्यक आहे.