कोरोना ची तिसरी लाट कुठल्या महिन्यात येणार? Corona lat-3

कोरोना ची तिसरी लाट कुठल्या महिन्यात येणार?

Covid 19 कोरोना चा वाढता प्रभाव ओसरत असून देशात कोरोना रुग्ण संख्येत चांगलेच घाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी प्रत्येक राज्याकडून अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु अनलॉक दरम्यान लोकांनी गाफिल न राहत कोरोना चे सर्व नियम पाळावेत. शिवाय लसीकरण करून घ्यावे. कारण संकेतानुसार कोरोना ची तिसरी लाट कधीही येऊ शकते असा इशारा नीती आयोगाने दिला आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तिसरी लाट येण्याचे संकेत काही कोविड तज्ञांनी दिले आहेत.

कोरोना ची तिसरी लाट कुठल्या महिन्यात येणार? Corona lat-3

भारताने कोविड च्या दुसऱ्या लाटेचा सामना चांगल्या प्रकारे केल्याने संसर्ग नियंत्रणात आला असून रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे असे मत नीती आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत यांनी व्यक्त केले आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे. येत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कोरोना ची तिसरी लाट येण्याचे खूपच स्पष्ट संकेत कोविड तज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे असेही मत सारस्वत यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात दुसऱ्या लाटे संदर्भात चांगल्या प्रकारे काम झाले आहे केंद्राने चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळली आहे त्यामुळे रुग्ण संख्या बरीच कमी झाली आहे. दुसरी लाट ओसरत असते तरी आपणास तिसऱ्या लाटेचा सामना करायचा आहे .तज्ञांच्या मते तिसरी लाट ही बालकांवर परिणाम कारक असल्यामुळे अति दक्षता घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

x