तांब्याची अंगठी घालण्याचे फायदे Copper Ring Benefits

तांब्याची अंगठी घालण्याचे फायदे

तांबे हा धातू सर्वात पवित्र आणि शुद्ध मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रात तांबे यांना धातुला अधिक महत्त्व आहे. तांबे धातू निर्माण करताना कोण अन्य कोणत्याही धातूचा वापर होत नसल्यामुळे हा धातू सर्वात शुद्ध असल्याचे मानले जाते.आपण अनेक प्रकारच्या धातूच्या अंगठ्या किंवा ब्रासलेट वापरत असतो पण त्यामध्ये काही गुणधर्म असतील तर आपल्याला फायदेशीर ठरेल. तांबे या धातू मध्ये अनेक गुणधर्म असल्यामुळे तांबे वापरणे आपणासाठी फायदेशीर ठरते.

तांब्याची अंगठी घालण्याचे फायदे Copper Ring Benefits

1) तांब्याची अंगठी धारण केल्यास मन शांत राहते तापट आणि आक्रमक व्यक्तीचे विचार यामुळे संयमित होतात.

2) तांबे या धातूचा एंटीऑक्सीडेंट ची मात्रा अधिक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते तांब्याचे कडे घातल्या मुळे सांधेदुखी कमी होते.

3) तांब्याची अंगठी Copper Ring सतत आपल्या शरीराच्या संपर्कात राहते त्यामुळे तांब्याच्या औषधी-गुण शरीराला मिळत राहतात यांनी रक्त शुद्ध होते.

4) ज्याप्रकारे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते त्याचप्रमाणे तांब्याची अंगठी मुळे देखील फायदा मिळतो.

5) तांब्याच्या अंगठी च्या प्रभावामुळे पोटाशी निगडित आजारात फायदा होण्यास मदत मिळते.

6) तांबे सतत त्वचेच्या संपर्कात राहते त्यामुळे त्वचेची चमक वाढते अन त्यामुळे तोंड धुताना अंगठी चेहऱ्याची संपर्क आल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन चेहरा तजेलदार राहतो.

7) आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्याचा उपयोग केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

8)तांब्याची अंगठी धारण केल्याने शरीरातील गर्मी कमी होते हे धारण केल्याने शारीरिक अथवा मानसिक तणाव कमी होतो तसेच रागावर देखील नियंत्रण राहते. तांब्याची अंगठी तन आणि मन दोघांनाही शांत ठेवण्यास मदत करते.

Leave a Comment

x