अकरावीच्या प्रवेशासाठी आता CET किती मार्कांची आणि कोणते विषय जाणून घ्या Common Entrance Test

अकरावीच्या प्रवेशासाठी आता CET किती मार्कांची आणि कोणते विषय जाणून घ्या

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार ही परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात येईल.

अकरावीच्या प्रवेशासाठी आता CET किती मार्कांची आणि कोणते विषय जाणून घ्या Common Entrance Test

नोंदणी प्रक्रिया ही दिनांक 19 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाली असून 21 ऑगस्ट ला परीक्षा होणार आहे.ही परीक्षा अकरावीच्या प्रवेशासाठी एकच असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी ही परीक्षा असणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा पूर्णपणे आधारित असून सीईटी परीक्षेच्या मार्क्स वरच विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळणार आहे.

परीक्षा 100 गुणांची असून त्यामध्ये इंग्रजी,गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी पंचवीस मार्कांचे प्रश्न असणार आहेत. सीईटी परीक्षा ही पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार.

परीक्षेसाठी परीक्षा केंद्राची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी शंभर गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी हा दोन तासांचा असेल.

ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे शुल्क भरले आहे त्यांच्याकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही.जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छित नाही त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यां नंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणाच्या आधारे होणार आहे.

3 thoughts on “अकरावीच्या प्रवेशासाठी आता CET किती मार्कांची आणि कोणते विषय जाणून घ्या Common Entrance Test”

Leave a Comment

x