नारळाच्या तेलाचे आश्चर्यकारक फायदे Coconut oil

नारळाच्या तेलाचे आश्चर्यकारक फायदे

Coconut oil नारळाचे तेल प्रत्येक हंगामात उपयुक्त आहे. एखादी जखम झाली असेल,त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. नारळ तेल कोणत्याही प्रकारचे जळजळ खाज होणे यावर वापरले जाते.

नारळाच्या तेलाचे आश्चर्यकारक फायदे Coconut oil

1) लोकांचे तोंड कोरडे झाल्यावर ओठ लवकर फाटतात. रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा तेल ओठावर लावून झोपा एका आठवड्यात आपले ओठ मऊ व त्यावरील त्वचा देखील निघणार नाही.

2) पुरळ, खाज येणे, कोरडी त्वचा या समस्या साठी नारळ तेल लावा या तिन्ही समस्यांपासून मुक्ती मिळेल.

3) रात्री झोपण्यापूर्वी Coconut oil नारळाचा तेल कोमट करून मानेवर आणि त्वचेवर हळुवारपणे मॉलिश करा असे केल्याने आपली त्वचा खूप मऊ आणि चमकदार बनेल.

4) नारळाच्या तेलातील घटकामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पासून संरक्षण होईल नियमितपणे
चेहऱ्यावर लावल्याने त्वचा घट्ट होऊन सुरकुत्या कमी होतील.

5)नखे उजळण्यासाठी देखील नारळ तेल वापरू शकता. नेलपॉलिश साफ केल्यानंतर आपले नखे पूर्णपणे कोरडे दिसतात नखांवर नारळ तेल लावल्याने नखे चमकदार होतील.

6) गरोदरपणात खाज आल्यामुळे स्ट्रेस मार्क येतात. त्यांना कमी करण्यासाठी डॉक्टर देखील नारळाचा तेल लावण्याचा सल्ला देतात. तसेच शरीरावर कुठेही जखम झाली असल्यास दररोज नारळाचे तेल लावू शकतात डाग कमी होतात.

Leave a Comment

x