बाल आरोग्य
आपल्या देशात बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यात बाळ जन्मताना पुरेशी काळजी न घेणे, बाळाचे वजन कमी होणे, जंतुदोष, निमोनिया हे प्रमुख प्रकार आहेत बालकांच्या आरोग्यावर जर नियमित नेहमीच लक्ष दिले तर हे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी बालकांची निगा कशी घ्यायची, बालकांचा पोषण आहार, बालकांचे लसीकरण, कुपोषण ,बालकांचे आजार, जन्मलेल्या बाळाचे काळजी, बालसंगोपन, बाळाच्या वाढीचे टप्पे, या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.
बालकांच्या आरोग्याची निगा
बाळाच्या जन्माच्या आधीपासून ते प्रत्यक्ष जन्मापर्यंत आणि त्यानंतर वयाच्या पाच वर्षापर्यंत बालकांची निगा घ्यावयाची असते. बालकांची निगा घेत असताना प्रत्येक बालकाला पुरेशी निगा आणि योग्य पोषाहार मिळणे आवश्यक असते. त्याची वाढ आणि विकास यांच्यावर देखरेख ठेवणे गरजेचे असते. त्यातील बदल शोधून काढणे व त्यावर वेळीच उपचार करणे.प्रशिशिक्षीत व्यक्ती दारे निगा घेणे आवश्यक असते.
गर्भाचे व नवजात बाळाची काळजी
गर्भधारणेदरम्यान निगा घेण्याचा एक उद्देश असा आहे की जिवंत आणि सुदृढ बालक जन्माला येणार. त्यामुळे जन्मानंतर निगा घेण्याचा उद्देश केवळ मातेची काळजी घेऊन त्याची आरोग्य समस्या सोडविणे हा नसून बाळाचं वजन कमी राहण्याने होणाऱ्या समस्या टाळणे. बाळाचा श्वास गुदमरणे, गर्भ जन्म त्रुटी इत्यादी टाळण्याचा उद्देश आहे. नवजात बाळाची काळजी जन्मापासून ते 28 दिवसपर्यंत घ्यावयाचे असते. ह्या काळातील बाळाची काळजी अत्यंत महत्त्वाची असते,कारण नवजात बाळाच्या मृत्यू ची शक्यता टाळण्यासाठी त्याची मदत होते. या काळात दिले जाणारे सेवा प्रसुती तज्ञ, बालरोगतज्ञ, परिचारिका, यांचा समावेश असलेल्या चमूने घ्यायची आहे. जन्मानंतर पहिल्या आठवड्यात घ्यावयाची निघा आणि विशेषतः पहिल्या 24 ते 48 तासांनी मधील निगा अत्यंत महत्त्वाची असते. नवजात बाळांचे योग्य ती निगा घेतल्यास 50 ते 60 टक्के या वर्गाचे मृत्यू टाळता येतात आणि यापैकी अर्धे मृत्यू हे त्याच्या आयुष्याच्या पहिल्या आठवड्यात टाळता येतात.
वाढ व विकास
बालकांची वाढ व विकास यांच्यावर सातत्याने देखरेख ठेवणे अत्यत महत्त्वाचे आहे. मुलांचे आरोग्य आणि पोषण आहार यांचा दर्जा सूचित होतो. सामान्यपणे बालकांची वाढ आणि विकास यामध्ये काही फारकत झाली आहे का हे शोधता येते आणि घरगुती तसेच आरोग्य केंद्राच्या मदतीने उपचार करता येतात. बालकांची वाढ म्हणजे शरीराचा आकार वाढणे, वजन-उंची डोके, हात, छातीचा घेर यांच्याद्वारे मोजला जातो हे मोजमाप संदर्भ मानकांचे जोडले जातात आणि ते सामान्य पातळीत आहेत किंवा नाही हे ठरवता येते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय स्तरावरील लोकांचा अभ्यास करून भारतीय मुलांसाठी संदर्भात मानके ठरवत असते. जागतिक आरोग्य संघटनेने देखील पाच वर्षाखालील मुलांसाठी संदर्भात मानके निश्चित केली असून ती जगभरात वापरले जातात वयोगटानुसार मुलांची वाढ वेगवेगळे असते आणि प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी अंतर्गत आणि बाह्य घटकांवर सारखे बदलते. बाळाचा विकास म्हणजे त्याची बुद्धी भावना आणि सामाजिक पयलू याबाबतीत त्यांचे कौशल्य आणि कार्याचा विकास होईल. मुलांची वाढ आणि विकास यांच्यावर विविध घटकांचा प्रभाव पडतो त्यामध्ये अनुवंशिकता, परंपरा,लिंग,बाळाच्या जन्मानंतर बाळाचे आणि मातेचे पोषण,घरातील चांगल्या सोयी सूर्यप्रकाश, सुरक्षित पाणीपुरवठा, संक्रमणाला प्रतिबंध आणि कुटुंबाचा आकार, जन्मक्रम आणि दोन मुलामधले अंतर, गर्भधारण में गर्भधारणेदरम्यान घेतलेली काळजी, यापैकी बहुतांश घटकावर कुटुंबाचे आणि विशेषतः मातेची सामाजिक आर्थिक स्थिती यांचा थेट प्रभाव पडतो.सामान्य विकास आणि वाढीला चालना देण्यासाठी हे सर्व घटक लक्षात ठेवणे गरजेचे आहे
वयोगटानुसार बाळाचा आहार
वयोगटानुसार बाळाला आहार देण्याचे महत्व जास्त आहे.झिरो ते सहा महिने फक्त बाळाला स्तनपान द्यावे .सहा ते नऊ महिने भाताची पेज, डाळीचे पाणी,मटणाचे सूप, नाचणीचे किंवा डाळ तांदळाची पेज, फळांचा रस घ्यावा, नऊ ते बारा महिने वरण-भात, उकडलेला बटाटा, कुस्करून केलेले पोळी दुधात बारीक करून दिलेली पोळी द्यावे एक वर्षानंतर बाळाला घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील ते थोडे कमी तिखट करून या वयाच्या मुलांना देता येते. दुसऱ्या वर्षात सुद्धा आईचे दूध बाळाच्या पोशक आहारातील महत्त्वाचा घटक असतो. त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षण होते. बाळ दीड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे जन्मापासून पाच वर्षानंतर बाळाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर ठराविक कालांतराने बाळाचे वजन उंची व शरीराचे इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासनी अधिकाऱ्यांना योग्य वाढीचे कारणे शोधून काढता येतील. सदर कारणानुसार त्या बालकांवर उपचार करून पुढील गुंतागुंत व मृत्यू निश्चितपणे टाळता येतील. पाच वर्षापर्यंत बालकांचे नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.
लसीकरण
लसीकरण हा बाळाच्या संगोपनाचा महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. एका वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. बाळ जन्माला आल्यानंतर वेळेवर लसीकरण केले पाहिजे म्हणजे अनेक आजारांपासून त्याचे संरक्षण होऊ शकते. एका वर्षाच्या आत क्षयरोग प्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, पोलिओ प्रतिबंधक लस गोवरची लस, दिली पाहिजेत.झिरो ते पाच वर्षे वयोगटात पर्यंत लसीकरण करणे आवश्यक आहे.
मुले सुदृढ ठेवण्यासाठी
मुले सुदृढ ठेवण्यासाठी मातेने सहा महिन्यापर्यंत अंगावरील दोन द्यावे. सहा महिन्यानंतरदुधाबरोबर अन्न सुद्धा द्यावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाच्या पोटात लहान असते त्यामुळे त्याला सहा ते नऊ महिन्या पर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे, झिरो ते पाच वर्षापर्यंत मुलांना सर्व लसीकरण करून घ्यावे. घरात जर लहान बाळ असेल तर परिसर स्वच्छ ठेवावा. म्हणजेच मुलांच्या आरोग्य आपोआपच सुधारेल. मुलांना नेहमी आंघोळ घालावे व कपडे वारंवार बदलावे. सकाळी उठल्यावर संडास नंतर व जेवणा आधी व नंतर आल्यानंतर मुलांनी आपल्या स्वच्छ हात धुवावेत.घराबाहेर उघड्यावरच न बसता संडास वापरावा. दात स्वच्छ घासण्याची सवय लावावी. गोळ्या, चॉकलेट देऊ नये पायात चप्पल किंवा बोट घालायची सवय लावावी. नखे न वाढवणे. फोड्,जखम झालेल्या मुलांचे कपडे वेगळे ठेवावे. तोंडात कुठल्याही अस्वच्छ वस्तू घालू नये. कुत्रे मांजरे यांना मुलांना चाटु देऊ नये.पिण्यासाठी स्वच्छ आणि उकडलेले पाणी वापरावे. जर एखाद्या मुलाच्या वजन कमी होत असेल एका जागेवर स्थिर असेल तर ते मुल निरोगी नाही असे समजावे.एक तर त्याला पुरेशा आहार मिळत नसेल किंवा गंभीर आजार झाला असेल,मूलाचा आहार व त्याची वाढ योग्य आहे हे कसे समजावे त्याचे वजन व उंची योग्याप्रमाणे वाढत आहे का ते बघावे.आरोग्य कार्डावर वजन योग्य दिशेने आहे किंवा नाही हे पाहावे.
बाल संगोपन
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा सर्वांगीण बाजूने शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होण्यासाठी आणि हा विकास, वाढ योग्य दिशेने होण्यासाठी आईने बऱ्याच गोष्टी लक्षपूर्वक कटाक्षाने पाळायला हव्यात. दिवस राहिल्या पासून मूल मोठे होईपर्यंत त्याची सर्वार्थाने काळजी घेणारी आईच असते. बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावे लागते, कोणते पथ्य पाळावे लागतात, हे आईला माहिती असणे आवश्यक असते. बाळाच्या आगमन तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. तो क्षण यशस्वी होण्याच्या दृष्टीने सर्वांगीण तयारी करायला हवी. गर्भाचे संपूर्ण वाढ होण्याच्या दृष्टीने तिने मनावर आणि शरीरावर कोणताही ताण पडू देता कामा नये, प्रथिने, खनिजे ,कॅलरीज आणि जीवनसत्व योग्य प्रमाणात मिळतील असा आहार गर्भवती स्त्रीने घ्यावा. फळे, दूध, पालेभाज्या असा आहार उत्तम तसेच मांसाहार करणार्या स्त्रियांनी अंडी, मांस,मासे या काळात आपल्या आहारात घेत जावे. अंगावरचे दूध हा सर्वात पौष्टिक आहार समजला जातो.बाळासाठी हे निसर्गाने पुरवलेले दूध असते.आईचे दूध माझ्या बाळाचे पहिले लसीकरण आहे. बाळाला अंगावरचं दूध पाजल्यामुळे बरेच फायदे होतात, त्याला विविध प्रकारच्या संसर्गापासून दूर ठेवता येते. प्रामुख्याने जुलाब,हागवण, सारख्या आजारापासून त्याचप्रमाणे क जीवनसत्व हे अंगावरच्या दुधातच मिळत असल्यामुळे बाळाला याची कमतरता पडत नाही. ते निर्जंतुक असते. त्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात, त्याचबरोबर बाळ आणि आई यांच्यात भावनिक नाते निर्माण होत असते.
कुपोषण
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे अशक्तपणाचे व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते त्याला कुपोषण म्हणतात व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.अ योग्य आहार, उपासमार व जीवनसत्वाचा अभाव याचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुले आजाराने सुद्धा अशक्त दिसू लागते उदाहरणार्थ अंगावर सूज येणे, बाळांची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात घटने, कमी जास्त प्रमाणात वाढणे, मुल रडके होणे यालाच कुपोषण म्हणतात. कुपोषणाचे काही लक्षणे सांगता येतील ..वजन कमी होणे, पोटाचा नगारा, हातापायाच्या काड्या,केस पिंगट, उदास चेहरा वाजणात घट कधीकधी सुजलेली मुले , फोड पायावर सूज, कुपोषणाची काही कारणे सुद्धा सांगता येतील.. लवकर अंगावरील दुध पाजणे बंद करणे, बाळाला भरपूर व वेळेवर अंगावरील दूध न मिळणे, पूरक पोषक आहाराचे उशिरा सुरुवात होणे, अ जीवनसत्वाचा अभाव, सतत आजारी पडणे, दोन मुलांमध्ये कमी अंतर असणे ,अनेक माता आपले मूल आजारी पडले असताना किंवा त्याला जुलाब होत असताना सकस आहार देण्याचे थांबवतात, परिणामी मुलाचा अशक्तपणा अधिकाधिक वाढून ते मृत्युमुखी पडण्याचा धोका जास्त राहतो. आजारी मुलांना पोषण आहाराची जास्त गरज असते, तो देण्यासाठी सतत सतत प्रयत्न करायला हवा. कुपोषणा वरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे बाळाला एक ते दीड वर्ष स्तनपान करणे, बाळाला पहिल्या दिवशी पासून वेळेवर दूध पाजणे, सहा महिन्यानंतर लगेच स्तनपान बरोबरच अन्न ला सुरुवात करावी, दोन मुलांमधील अंतर कमीत कमी 3 वर्ष असावे,मुलाचे सर्व लसीकरण वेळेवर करावे, अंगणवाडी चा पोषक आहार मुलांना वेळेवर व नियमित घ्यावा. ज्यामुळे समस्या उद्भवणार नाही व बाळ निरोगी राहील.
पोष्टीक आहार
आपल्याला माहीतच आहे की,मुले जंक फूड खाण्याला प्राधान्य देतात.मुले हल्ले ऐकत नाहीत. सतत बाहेरच खायला हट्ट धरतात त्यामुळे वजन वाढत, मुलं नीट खात नाहीत अशावेळी मुलांना योग्य आहार कसा द्यायचा आहे बघूया. सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट देऊनच मुलांना शाळेत पाठवा. पोट व्यवस्थित भरलेला असेल तर मधल्या सुट्टीत एखादा सँडविच खाऊन त्याचं पोट भरू शकेल.पालकांनी मुलांचा खाण्यापिण्याचे वेळापत्रक ठरवा. भूक लागले की लगेच बाहेर जाऊन खायचे.ही मुलांची सवय घालवायला हवी असेल तर, त्यांना घरातच काय खायला द्यायचं याची तयारी करून ठेवा. भूक लागली की लगेच मिळतील असे छोटे छोटे पाकीट तयार करून ठेवा. त्यात भाजी, फळे, सुकामेवा, धान्याची बिस्कीट ,सोयाबीन, दही अशा गोष्टी मुलांच्या खोलीत किंवा गाडीत नेऊन ठेवा.शिवाय त्याच्या हाताला येतील अशा पाण्याच्या बाटल्या सुद्धा भरून ठेवा. गोळ्या चॉकलेट कोल्ड्रिंक्स मुलांना माहीत नसणाऱ्या ठिकाणी ठेवा जेणेकरून भूक लागल्यावर त्यांना ते खाण्याची इच्छा होणार नाही. मुलांच्या काही सवयी घालवता येत नसतील तर त्यांना पर्यायी उपाय शोधा त्यांना दुधात बिस्कीट बुडवून खायची सवय असेल तर त्याविषयी हेल्दी बिस्किटे देऊन बघा. संध्याकाळी आइस क्रीम खायची सवय असेल तर त्यांना पर्याय म्हणून ताज्या फळ द्या. जंग फुट कधीतरी एकदा खाण्यास हरकत नाही पण त्याचा आहारात असणारा सततचा समावेश मुलांच्या आरोग्याला घातक ठरू शकतो. याबरोबरच खाण्याच्या बाबतीत या मुलांच्या वाईट सवयी काढून टाकण्याचा प्रयत्न करा जकफूड ला पर्याय म्हणून वेगवेगळे पदार्थ उपलब्ध आहेत याची चव चांगली असून ते हेल्दी असल्याने मुलांना देता येते. खाण्याच्या बाबतीत जर वाईट सवयी लागल्या तर आयुष्यभर तशाच राहतात, म्हणून सुरुवातीपासूनच चांगल्या सवयी लावून घ्या.याचा तुमच्या शरीराला फायदा होईल लहानपणीच्या सवयी अंगवळणी पडल्या के संपूर्ण आयुष्यभर त्या तुमचे साथ देत राहतात.