कांजण्या(चिकन पॉक्स),कोणाला होतो,लक्षणे, उपचार व उपाययोजना,chickenpox

कांजण्या ( चिकन पॉक्स)

काजण्या हा व्हेरीसल्ला झोस्टर या विषाणू पासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. इंग्रजी भाषेत चिकन पॉक्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या या रोगाची लागण सामान्यता लहान मुलांना सर्वाधिक होते. पण जर लहानपणी हा रोग झाला नसेल तर मोठ्या व्यक्तींना देखील याची लागण होण्याची शक्यता असते. हा आजार एकदा येऊन गेला की पुन्हा होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहून कालांतराने त्या व्यक्तीस नागिन या रोगाची लागण होते. अंगावर पुरळ येणे, आधी दोन दिवस तसेच अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली झाल्या पर्यंत रुग्णापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली धरे पर्यंतचा कालावधी हा सात दिवसांचा असतो. त्यामुळे या काळात कांजण्या झालेल्या मुलांना सात दिवस शाळेत न जाण्याचा सल्ला दिला जातो.कारण रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क आल्यास या रोगाचे विषाणू हवेमार्फत प्रसारित होतात कारण हा गंभीर आजार नाही.परंतु काही वेळा परळी मध्ये निमोनिया, अतिसार, मेंदूज्वर आणि कावीळ चा संसर्ग झाल्यास गंभीर परिस्थिती ओढवू शकते.गर्भवती मातेस प्रसूतीपूर्वी काजण्या झाल्यास अभ्रकाच्या मेंदूची वाढ पुरेशी होत नाही. परिणामी या बालकांच्या मृत्यूची शक्यता निर्माण होते. मुख्यतः प्रौढ आणि पंधरा वर्षांहून अधिक वयाच्या काजण्या झालेल्या प्रौढ व्यक्तीमध्ये आजाराचे स्वरूप गंभीर असते. त्यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. या आजाराची लक्षणे कांजण्या या आजारात विषाणूची लागण झाल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यानंतर आजाराची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. लहान मुलांमध्ये पुरळ उठण्यापूर्वी सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप, पाठ दुखी, हुडहुडी अस्वस्थता अशी लक्षणे साधारणता 24 तासांपर्यंत दिसून येतात. प्रौढांमध्ये ही लक्षणे साधारणता पुरळ उठणे अगोदर दोन ते तीन दिवसापर्यंत राहतात. त्यानंतर डोके मान आणि शरीराच्या वरील भागात तांबूस रंगाचे लहान पुरळ येण्यास सुरुवात होते. काही तासानंतर पुरळावर खाज सुटून त्यात पाणी भरते व त्यांच्या संख्येत वाढ होते.शरीरावर पुरळच्या निर्मितीचे विविध टप्पे आढळतात. काही रुग्णांमध्ये पुरडची संख्या कमी असते तर काही रुग्णांच्या संपूर्ण शरीरावर तसेच तोंडाच्या आतील भागात कान नाक यावर सुद्धा पुरळ उठतात.साधारणता चार ते सात दिवसानंतर खपली धरण्यास सुरुवात होते. काजण्या झालेल्या काही रुग्णांमध्ये डोकेदुखी ताप पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात. प्रौढ रुग्णांमध्ये रोगाची तीव्रता जास्त ते साधारणतः आठ ते दहा दिवसात पूर्ण बरा होतो वरील लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.

उपचार व उपायोजना

कांजण्या झाल्यावर रुग्णाचे घरी योग्य काळजी घेतल्यास जंतुसंसर्ग टाळता येऊ शकतो. उपचारांमध्ये ताप कमी करणे व जंतू संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे रुग्णाच्या अंगाची खाज कमी करण्यासाठी अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा रुग्णास थंड आणि कोमट पाण्याने स्नान घातलेल्या आराम मिळतो. खाज कमी करण्यासाठी कोरफडीची गर देखील फायदेशीर ठरतो. तोंडामध्ये पुरळ उठल्यास रुग्णाला पाणी पिणे व अन्न गिलण्यास त्रास होतो. अशा वेळी रुग्णाला शरबत मऊ खीर लापशी असे सहज गीळता येईल असे अन्नपदार्थ खाण्यास द्यावेत. कांजण्या यावर प्रतिबंधक उपाय म्हणून प्रतिबंधक लसीकरण करणे व आजारी व्यक्तीच्या संपर्कात न येणे आवश्यक असते. बारा ते अठरा महिन्याच्या आतील पालकांचे काजण्या प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने 72 तासाच्या आत varicella zoster immune globulin चे इंजेक्शन घेणे आवश्यक आहे.रुग्णाचे अचूक निदान पुरळ उठल्यानंतर सहा दिवसानंतर रुग्णांचे विलगीकरण तसेच रुग्णाच्या नाग व घशातील स्त्रावणे बाधा झालेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. पुरळावर कापले धरल्यानंतर रुग्णना मार्फत कांजण्या चा प्रसार होत नाही. पुरळ खाजविले तर त्वचेवर डाग पडून जंतुसंसर्ग होऊ शकतो अशा वेळी लहान बालकां कडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. कांजण्या आल्यानंतर जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी रुग्णाची नखे कापावेत. मोठ्या वयाच्या रुग्णाला खाजवू नको अशा सूचना द्याव्यात व लहान मुलांच्या हातात मऊ कपडा बांधून ठेवावा. हा रोग संसर्गजन्य व विषाणुजन्य असल्यामुळे स्वच्छता व तापाचे नियंत्रण करणे या गोष्टी प्रामुख्याने काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

x