मुलांची हुशारी दिसून येण्यासाठी दररोज खायला द्या हे पदार्थ
Brain Food मुलांनी प्रगती करावी अशी सर्व पालकांची इच्छा असते.अशातच त्यांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण योग्य आहारामुळे मेंदु वेगाने काम करतो. मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर मुलांना हे पदार्थ खायला द्या.
मुलांची हुशारी दिसून येण्यासाठी दररोज खायला द्या हे पदार्थ Brain Food
1) दूध- दुधाला पूर्णान्न म्हटले जाते. मुले दूध आवडीने पितात.दुधामुळे कॅल्शियमची कमतरता भरून निघेल व रोग प्रतिकारक शक्ती वाढेल.
2) ड्रायफ्रूट्स- ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह,अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने शरीराला सर्व आवश्यक घटक मिळतात, याने मेंदूचा विकास होतो. ड्रायफूट खाल्ल्याने ताकद मिळते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.अक्रोड ला तर ब्रेन फूड असे म्हणतात.
3) सकस आहार-जेवणात ऑलिव ऑइल चा समावेश करावा.ऑलिव्ह ऑइल मध्ये विटामिन इ आणि के ,खनिजे आढळतात हे मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य आहे याने स्मरणशक्ती सुधारते. Brain Food ऑलिव्ह ऑइल ने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
4)अंडी आणि मासे-अंडी मध्ये प्रथिने,जीवनसत्त्वे, कॅल्शिअम इतर आवश्यक घटक असल्याने मेंदूच्या पेशी विकसित होतात.
5)फळे- फळांमध्ये अनेक गुणधर्म आढळतात. मुलांच्या आहारामध्ये फळांचा समावेश करा.