शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हा उपाय करा Body Heat Reduce

शरीरातील उष्णता लगेच कमी करण्यासाठी हा उपाय करा

Body Heat Reduce उन्हाळा संपत आला आहे पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंमध्ये वाढणारे उष्णता डोकेदुखी ठरू शकते. वाढत्या उष्णतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हे वाढलेली उष्णता कमी करायचे असेल तर आपण घरच्या घरी उपाय करू शकता. निसर्गामध्ये अशा वनस्पती आहेत त्यांचा उपयोग करून आपण उष्णता कमी करू शकतो.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हा उपाय करा Body Heat Reduce

1)जर शरीरात उष्णता जास्त होऊन शरीराचे तापमान वाढले असेल तर त्यावर पटकन करायचा उपाय म्हणजे पाणी पिणे,एक ते दोन ग्लास पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान पटकन कमी होण्यास मदत होते.

2) शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे दररोज रात्री मनुके कोमट पाण्यात भिजवावे सकाळी उठल्यावर हे मनुके पाण्यासकट चावून खावे.

3) ताकामुळे Body Heat Reduce शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यानंतर ताक प्यावे मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताका चे सेवन करू नये.

4) स्वयंपाक घरातील जीरे हा मसाल्याचा पदार्थ थंड आहे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे घ्यावे. त्यानंतर सकाळी पाणी प्यावे उष्णता कमी होते तसेच वजनही नियंत्रणात राहते.

5) निसर्गामध्ये करंजीचे पान आपण बघितले असतील किंवा करंजीचे तेल जर पायांना रात्री मॉलिश केले तर उष्णता आणि शरीरातील दाह कमी होतो.

6) पळसाचे पान सर्वांनीच बघितले असतील कारण याच पळसाच्या पानाचे पत्रवाळी आपण जेवण केले असेल. पूर्वी लोक पळसाच्या पानावर जेवण करत असत. पळसाचे पानांमध्ये असा गुणधर्म आहे की जो उष्णता शोषून घेतो. पळसाच्या पाने घेऊन त्याचा रस काढावा आणि तो प्यावा त्यामुळे उष्णता कमी होते. जास्त रस घेतला तर त्रास होऊ शकतो त्रास झाल्यास रस घेणे बंद करावे.

See also  होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी कशा प्रकारे उपचार घ्यावा Home Quarantine Treatment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x