व्हॉट्सअप चे ब्लु टिक बंद असले तरी मेसेज वाचले की नाही हे कळणार blue tick feature of whatsapp

व्हाट्सअप चे ब्लु टिक बंद असले तरी मेसेज वाचले की नाही हे कसे कळणार

व्हाट्सअप ने 2014 मध्ये ब्लु टिक फिचर सादर केले समोरच्या व्यक्तीने आपण पाठवलेला संदेश पाहिला किंवा नाही हे समजतं. सिंगल टिक म्हणजे आपला संदेश गेला. डबल टिक म्हणजे संदेश प्राप्त झाला.आणि निळा टीक म्हणजे रिसीवर ने संदेश पाहिला. आपण पाठवलेला संदेश समोरच्या व्यक्तीने पाहावा अशी इच्छा असते पण फिचर च्या माध्यमातून बरेच लोक ब्लु टिक बंद करून ठेवतात त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही परंतु आता ब्लु टिक बंद असले तरी आपल्याला संदेश पाहला किंवा नाही हे कळेल.

व्हॉट्सअप चे ब्लु टिक बंद असले तरी मेसेज वाचले की नाही हे कळणार blue tick feature of whatsapp

1) सर्वप्रथम व्हाट्सअप उघडा आणि मेसेज करू इच्छित व्यक्तीला आपला संदेश पाठवा संदेश पाठवल्यानंतर थोडावेळ वाट बघा त्या व्यक्तीने आपले ब्लु टिक बंद केले असल्याची पुष्टी करा.

2)आपण पाठवलेल्या मेसेज वर दोन ग्रेट टिक दिसत असावे दोन टीक चा अर्थ समोरच्याचं नेट सुरु आहे आणि मेसेज रिसिव देखील झाला आहे. बराच वेळा नंतर जर आपल्याला ब्लु टिक दिसत नसेल तर ही युक्ती वापरावी.

3) आपल्याला केवळ एक व्हॉइस मेसेज पाठवायचा आहे ज्याद्वारे ती व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे किंवा नाही हे समजेल.

4)आपणास व्हॉईस मेसेज मध्ये काही बोलण्याची आवश्यकता नाही हा वाईस मेसेज पाठवल्यावर आपण त्यावर एक ग्रे कलर माईक चिन्ह बघू शकता. हा आयकॉन समोरचा आपला मेसेज एकत नाही तोपर्यंत दिसेल.

5) समोरच्या व्यक्तीने व्हाट्सअप मॅसेज एकताच ग्रे माइक चा रंग निळा होईल व व्हॉइस मेसेज वर ब्लु टिक दिसू लागेल त्यामुळे आपल्याला समजेल की व्यक्ती मेसेज पाहत आहे पण आपल्याला प्रत्युत्तर देत नाही.

See also  मोबाईल डेटा नेहमी चालू ठेवा जाणून घ्या फायदे keep mobile data always active

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x