बहुगुणी कडुलिंब अनेक आजारावर गुणकारी Benefits of Kadulimb

बहुगुनी कडूलिंब अनेक आजारांवर गुणकारी

कडुलिंबाची ओळख सर्वांनाच आहे. कडूलिंबाचे झाड हे निसर्गाने निरोगी राहण्यासाठी बनविले आहे. दररोज जरा पण कडूलिंबाच्या दोन कोवळ्या पानांचे सेवन केले तर आपले आरोग्य उत्तम राहील. जाणून घेऊया कडूलिंब कोणत्या आजारांवर गुणकारी आहे.

बहुगुणी कडुलिंब अनेक आजारावर गुणकारी Benefits of Kadulimb

1) आपल्या दातांसाठी कडूलिंब खुप फायदेशीर आहे. रोज कडू लिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात.

2)तुम्हाला जर पित्ताशयाच्या बाबतीत आजार असेल तर कडू लिंबाचा रस उपायकारक आहे या सगळ्या आजारांवर कडुलिंबाच्या रसापासून मुक्तता मिळते.

3) Benefits of Kadulimb कडू लिंबाचे मध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे आपण जर कडू लिंबाची साल,पान आणि फळ या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्याला लावले तर फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.

4) कडूलिंबाच्या पानाचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो.त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडूलिंबाच्या पानाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.

5) जर त्वचेचे आजार, संसर्गजन्य रोग असेल तर गरम पाण्यामध्ये थोडे कडूलिंबाचे पाने उकळावे. आणि त्या पाण्याने अंघोळ करावी.

6) घरामध्ये धान्यामध्ये जर किडे होत असतील तर कडूलिंबाची पाने ठेवा. त्यामध्ये किडे-मुंग्या उंदराचा त्रास होणार नाही. धान्ये हे सुरक्षित राहील.

7) कफ खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडूलिंबाचा वापर होतो.

8) आपण बाहेरील फास्ट फूड, चटपटीत खातो. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या पोटात जंत निर्माण होतात किंवा इन्फेक्शन होते अशावेळी कडुलिंबाची पाने खाणे फायदेशीर ठरते.

See also  कोणती फळे व्हिटॅमिन-सी ची कमतरता दूर करतात Vitamin-C

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x