गुणकारी गुळवेल/गिलोय ने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती जाणून घ्या आरोग्य दायी फायदे Benefits of Giloy/Gulvel

गुणकारी गुळवेल/गिलोय ने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Benefits of Giloy/Gulvel कोरोना चा सतत वाढता संसर्ग या पासून बचावासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवणे आवश्यक आहे.घरी राहूनच आज आपण अनेक उपाय करत असला तरी सर्वच गुणधर्मांनी भरलेली औषधे म्हणजे गिलोय आहे.यालाच गुळवेल देखील म्हणतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर जाणून घेऊया गुळवेलाचे फायदे

गुणकारी गुळवेल/गिलोय ने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती जाणून घ्या आरोग्य दायी फायदे Benefits of Giloy/Gulvel

1)गुळवेल हा कडूलिंबा वरील वापरणे आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. गुळवेल हा बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणाऱ्या संक्रमना विरुद्ध लढण्यासाठी फार उपयुक्त आहे.

2) बऱ्याच दिवसापासून ताप येत असेल आणि तापाचे प्रमाण कमी होत नसेल तर गिलोय चा काढा घेणे फायदेशीर ठरेल.डेंगू मध्ये गुळवेलचा रस अत्यंत फायदेशीर आहे.

3) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करते.

4) डोळ्यातील कमकुवतपणा दूर करण्यासाठी गिलोय फायदेशीर

5) मानसिक तणावापासून आराम तसेच श्वासा संबंधी समस्या वर फायदेशीर पचन क्रिया व्यवस्थित ठेवणे लठ्ठपणाची समस्या दूर होते.

6) चरबी कमी करण्यासाठी गुळवेल रसात लिंबाचा रस मिसळून प्यावा.

7) Benefits of Gilou गुळवेलचा काढा आपण घरच्या घरी बनवू शकता.सर्वप्रथम जाणकार व्यक्तीकडून गुळवेला ची पारख करून घ्या.गुळवेलाची एक फांदी घेऊन त्याचे लहान लहान तुकडे करा आता ते तुकडे सोलून घ्या. हे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या नंतर एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. एक कप होईपर्यंत उकडून द्या. झाला काढा तयार.काढ्यामध्ये चवीसाठी विलायची,गुळ, तुळशीचे पाने, आद्रक, टाकू शकता. बाजारामध्ये गिलोय वटी सुद्धा मिळते.सर्व गुणधर्म असलेले गुळवेल ही वनस्पती फार उपयुक्त आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

One thought on “गुणकारी गुळवेल/गिलोय ने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती जाणून घ्या आरोग्य दायी फायदे Benefits of Giloy/Gulvel

Leave a Reply

Your email address will not be published.

x