सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे Benefits of Cycling

सायकल चालविण्याचे आरोग्यदायी फायदे

दिवसेदिवस आरोग्याच्या समस्या वाढतच आहेत. आज निरोगी आरोग्य सर्वांनाच हवे आहे. पण धावपळीच्या जीवनातून जर अर्धा – एक तास आरोग्याला दिला तर आरोग्यासाठी फायदेशीर. दररोज चार ते पाच किमी सायकल जर आपण चालवली तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील सायकलची किंमत म्हणजे आपला आजार झाल्यानंतर चा एका दिवसाचा दवाखान्याचा खर्च. तेव्हा लाजू नका,अभिमान बाळगा. सायकल चालवा फिट राहा.

सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे Benefits of Cycling

1) सायकल चालवण्यामुळे मांड्या,शीट, पोट यावरील चरबी कमी होते. तसेच वजन कमी होण्यास मदत होते.

2) ब्लड प्रेशर नियंत्रित,शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहते.

3) मासपेशी मजबूत होतात,आनि रक्ताभिसरण सुद्धा वाढते.

4) सायकल चालवणे यामुळे मणक्याचे विकार व पाठ दुखी कमी होते.

5) पचनशक्ती वाढते आरोग्य सुधारून आयुष्य वाढते.

6) नेहमी सायकल चालवल्याने Benefits of Cycling जीवनातील आनंद वाढतो.

7) पेट्रोल-डिझेलची वाढती किंमत पाहता आर्थिक बचत सुद्धा होते.

8) सायकल चालवल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

9) परकीय चलन वाचल्याने देशाचा फायदा होतो व आपलाही फायदा होतो.

10) पेट्रोलचे वाचलेले पैसे चांगला आहार फळे भाज्या यावर खर्च करा.

11) सायकल चालवल्याने हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते शरीर लवचिक व काटक बनते.

Leave a Comment

x