स्तनपानाचे फायदे, स्तनपान किती वेळा करावे benefits of breast feeding

स्तनपानाचे फायदे

स्तनपानाचे फायदे, स्तनपान किती वेळा करावे, किती कालावधी साठी करावे,स्तनपान विषयी गैरसमजुती,benefits of breast feeding. स्तनपान म्हणजे मायलेकरांची आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. भारतीय समाजाला स्तनपानाचे महत्त्व पटवून सांगण्याची काही गरज नाही.तरीपण स्तनपानाविषयी अनेक प्रश्न आईच्या मनामध्ये निर्माण होतात. स्तनपान म्हणजे आई व बाळ यांचं नातं दृढ करणारा प्रसुतीनंतर चा एक नैसर्गिक टप्पा.स्तनपानाचे आई व बाळासाठी अनेक फायदे, माहिती असून सुद्धा नीट स्तनपान करू शकत नाही त्यांना अनेक अडचणी येतात. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आईच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतात. प्रसुतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे जन्मानंतर बाळाला लगेच स्तनपान द्यावे. किमान पहिले एका तासात नक्की द्यावे.

हिटलर विषयी 32 सत्य जे आपल्याला माहिती नाहीत, Amazing Facts about Hitler

प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तना मधूनच चिक येतो हा चीक बाळासाठी अमूल्य असतो. चिकामध्ये ए आणि के हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात. त्यांमध्ये प्रतिबंधक द्रव्य व इतर आवश्यक घटक असल्यामुळे जन्तुसंसर्गापासून बाळाचे रक्षण होते. यामध्ये प्रथिने व कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाच्या वाढीला फायदा होतो. स्तनपानाचे अनेक फायदे माता व बालक दोघांनाही मिळतात. आईचे दुध बाळासाठी अमृतच आहे. मातेच्या दुधामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके व बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा योग्य मिलाफ असतो. ह्यामुळे बाळाची नीट वाढ होते.

बाळाची प्रतिकारशक्ती वाढते benefits of breast feeding

मातेच्या दुधातील प्रतिबंधक द्रव्यांमुळे बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राहते. जंतुसंसर्ग अथवा एलर्जी पासून बाळाला संरक्षण मिळते.आईचे दूध निर्जंतुक असल्याने बाळाला जंतुसंसर्ग होत नाही.स्तनपानामुळे आई व बाळा मधील नाते अधिक दृढ होते.बाळामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते. स्तनपानामुळे बाळाचे स्नायू नीट तयार होतात. स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते.स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे शक्य होते.स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते. स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाचा मधील बदलामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते.

सर्वसाधारणपणे मातेने बाळाला भुकेप्रमाणे दूध पाजावे.ठराविक वेळा ठरवून दूध पाजण्याची गरज नाही. बाळाची वाढ होत असताना ते गरजेप्रमाणे दुध पिते. मात्र तीन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे.काही विशिष्ट वेळेला मात्र दर दोन तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. उदाहरणार्थ अपुर्या दिवसांचे बाळ अडीच किलोपेक्षा कमी अथवा साडेतीन पेक्षा जास्त वजनाची बाळे तसेच गर्भावस्थेमध्ये मधुमेह झालेल्या स्त्रियांची बाळे. स्तनपान नंतर बाळ किमान दोन तास शांत झोपत असेल दिवसातून सहा ते आठ वेळा सु-शी करत असेल व बाळाचे वजन योग्यरीत्या वाढत असेल तर याचा अर्थ बाळाला पुरेसे दूध मिळत आहे.

स्त्री आरोग्य

अनेक स्त्रियांना दूध कमी असण्याचे धास्ती वाटते व त्या बाळांना पूर्ण वरचे दूध देतात यामुळे बाळ आईचे दूध पीत नाही. बाळाने आईचे स्तनाग्र चुकल्यामुळे आईच्या शरीरातील ऑक्सिटोसिन या संप्रेरकांचे प्रमाण वाढवू दूध सहजरित्या वाहू लागते. बाळाने स्तनातून दूध कमी प्यायला तर दूध कमी होते. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांचा आहार चौरस असायला हवा. पालेभाज्या मोड आलेली कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा योग्य प्रमाणात केल्याने वापर केल्याने दूध वाढण्यास मदत होते. दररोज किमान तीन लिटर पाणी प्यावे. स्तनपान करत असल्याने बाहेरील खाद्यपदार्थ तसेच जंगफूड टाळावे.

स्तनपान करताना कुठल्या आजारासाठी औषध उपचार घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.बाळावर औषधांचा विपरीत परिणाम होणार नाही याची सुद्धा खात्री करून घ्यावी ते डॉक्टरी सल्ल्यानुसार.आई आजारी असताना वैद्यकीय सल्ल्यानुसार स्तनपान करू शकते. स्तनपान करताना स्तनांच्या स्वच्छतेचे नीट काळजी घ्यावी. शक्‍यतोवर बसूनच स्तनपान करावे.बैठक आरामदायी हवी, तिने पाठीला नीट आधार द्यावा. स्तनपान करताना आजुबाजूचे वातावरण शांत हवेशीर असावे. गडबड-गोंधळ असू नये. स्तनपान करणार्‍या मातेला अनेकदा भावनिक आधाराची गरज असते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्तनपान करावे.

किती दिवस स्तनपान करावे?

आईचे दूध हे पूर्णान्न आहे म्हणूनच आपण घेत असलेल्या बाळाला अन्य काही आहार देण्याची गरज नसते. जन्मानंतर मातेने प्रथम सहा महिने फक्त स्तनपान करावे दूध पुरेसे नसल्याचा औषधोपचार घ्यावेत. सहा महिन्यानंतर अथवा पुरेशे दुध येत नसल्यास वैद्यकीय सल्लाने इ तर आहार बाळाला द्यावा. जन्मानंतर मध चाटविणे, साखरेचे पाणी देणे तसेच बाळगुटी अथवा स्वर्णवेढणी बाळाला देणे हे त्याच्यासाठी धोक्याचे असते.benefits of breast feeding किमान एक वर्ष बाळाला स्तनपान द्यावे स्तनग्र सपाट अथवा आत ओढले असले तरी बाळाची स्तनावर व्यवस्थित पकड असल्यास बाळाला नीट दूध देता येते साधारणता बाळाची स्तनाग्र वरील पकड नीट नसल्यास पुरेसे दूध देत नाही.

बाळ स्तनाग्र चाऊन जखमा करते असे समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. जखमेवर आईचे दूध लावल्यास जखम बरी होते. जखम बरी होत नसल्यास त्यांना मध्ये दुखत असल्यास अथवा गाठ झाली असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे उचित ठरते. स्तनपानाविषयी अनेक गैरसमजुती समाजामध्ये आहेत असे म्हटले जाते की उजव्या स्तनातून पाणी डाव्या स्तनामधून दूध देते. खरंतर प्रत्येक स्तनमध्ये प्रथम येणारे दूध हे पाणीदार असते. त्याने बाळाचे तहान भागते व नंतर येणारे दूध घट्ट असते त्याने बाळाची भूक भागते व बाळाचे वजन वाढण्यास मदत होते.

बाळांमध्ये किती अंतर असावे?

स्तनाच्या आकारावर दुधाचे प्रमाण अवलंबून असते तर असे काही नसून स्तनांच्या आकारावर दुधाचे प्रमाण अवलंबून नसते स्तनपान करीत असताना गर्भधारणा होत नाही. पूर्णपणे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर पहिले सहा महिने गर्भधारणेचा धोका कमी असतो परंतु तो शून्य नसतो. म्हणूनच गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक वापरायला हवे.जुळे बाळ असल्याने स्तनपान करणे शक्य नसते जुडी बाळे असली तर पूर्णपणे स्तनपान करता येऊ शकते ते आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही. दोन बाळांच्या स्थानांमध्ये थोडा वेळ दिला तर हे शक्य होते. benefits of breast feeding

जन्मानंतर बाळाचा श्वासोच्छवास नीट असल्याची खात्री केली जाते व बाळाच्या पंज्या वतिरिक्त बाळाला कोरडे करून आईच्या स्तनांमध्ये पालथे झोपवले जाते बाळ तोंड उघडून स्थन शोधण्याचा प्रयत्न करते व स्तनाग्र चौक यला सुरुवात करते. दुध निर्मिती व्यवस्था सर्व स्त्रियांमध्ये सारख्याच प्रमाणात असते स्तनांचा आकार कमी जास्त असतो त्यांच्यामधील मेदाच्या प्रमाणामुळे म्हणजेच असतानांच आकार उकाराच्या आणि यशस्वी स्तनपानाचा अर्थाअर्थी संबंध नाही. स्तनपानाच्या क्रियेमुळे मातेच्या शरीरात प्रो लेक्टींग नावाचे संप्रेरक स्त्रवते.

काळजी कशी घ्यावी?

बाळ लूचू लागले की स्तनाग्रपासून मेंदूला प्रो लयक्तिन सोडल्याबद्दल संदेश जातात आणि मग मेंदूच्या तळाशी असलेल्या पिटुट्री ग्रंथी तुन ते पाझरू लागते बाळाने पिऊन पिऊन स्तन रिक्त झाले की रात्री-अपरात्री बाळाला पाजले की प्रो लकटीनआणखी जोरात येते दिवसभरात किती एकदा आणि किती दिवसात बाळ पित् यावर दूध तयार होणं अवलंबून असतं.म्हणूनच कुणाला जुडी असतील तर आपोआपच बराच वेळ दिवस-रात्र पाजत राहावे लागतात आणि दोन्ही बाळांना पुरेल एवढं निश्चितच तयार होतं. भरपूर दूध देण्यासाठी बाळाला अधिक वेळा अधिक काळा आणि विशेषतः रात्री अंगावर घेणे आवश्यक आहे.benefits of breast feeding

दूध पिळून काढले तरी प्रोकलियन प्रभाव वाढू लागतो. त्यामुळे स्तनपान हे बाळासाठी एक लसीकरणाच आहे. बाळाला जन्मताच आणि वाढीप्रमाणे जर दूध मिळाले तर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ बनते आणि वयात आल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी कमी होतात त्यामुळे प्रत्येक मातेने स्तनपान चे महत्त्व जाणून बाळाला योग्यरीत्या आणि योग्य वेळेत आणि नियमित स्तनपान करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

x