शेतकऱ्यांसाठी खुशखबर-उत्पन्न वाढविण्यासाठी मोदी सरकार कडून किसान सारथी Benefits Kisan Sarthi

शेतकऱ्यांसाठी खूशखबर- उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार कडून किसान सारथी

कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत असतात. नवनवीन शेती तंत्रज्ञानामुळे शेती उत्पन्नामध्ये भर पडत असते. हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले तर उत्पन्नात वाढ होईल. याच उद्देशाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी हे सुरू केले आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर-उत्पन्न वाढविण्यासाठी मोदी सरकार कडून किसान सारथी Benefits Kisan Sarthi

या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना पीक व इतर बाबींची माहिती दिली जाईल. ज्या आधारे शेतकरी आपले पीक आणि भाजीपाला योग्यरीत्या बाजारात विकू शकतील.डिजिटल प्लॅटफॉर्म च्या साह्याने शेतकऱ्यांना आपल्या भाषेत पूर्ण माहिती मिळू शकेल. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किसान सारथी या डिजिटल प्लॅटफॉर्म चे लॉंचिंग केले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट वैज्ञानिका कडून शेतीविषयक संपूर्ण माहिती आणि कृषी क्षेत्रातील वैयक्तिक सल्ला शेतकरी घेऊ शकतात.

शेतकऱ्यांचे धान्य त्यांच्या शेतात,गोदामे,बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी पोहोचविण्याच्या क्षेत्रात नवीन नवीन संशोधन केले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कमी खर्चात विकू शकतील. डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथीच्या साह्याने शेतकऱ्यांना चांगले पीक योग्य उत्पादन आणि इतर अनेक मूलभूत गोष्टींची माहिती मिळू शकेल. शेतकरी पिकाची संबंधित कोणतीही माहिती थेट वैज्ञानिकाकडून डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे घेऊ शकतात तसेच शेतकरी शेतीच्या नवीन पद्धती शिकू शकतात.

See also  कृषी यांत्रिकीकरण योजना Krishi Yantritikaran Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x