पाठदुखी उपाय,backache in marathi,backpain

पाठ दुखीवर सोपा उपाय

पाठ दुखी चा उपचार खूप सोपा आणि सरळ आहे. आपण त्याला गुंतागुंतीचा बनवतो.त्याचे प्रमुख कारणे म्हणजे पाठ दुखी अंगावर काढणे. सतत केवळ वेदनाशामक गोळ्या घेऊन काम करणे. डॉक्टरांचा सल्ला न घेता देशी इलाज करत बसणे. उदाहरणार्थ मान,पाठ मोडून घेणे, मान्यवर लाटणे फिरवणे, पाठीला दोर बांधून झटका मारणे इत्यादी असे केले तर सर्वसाधारण पाठ दुखी तुम्हाला शस्त्रक्रिया पर्यंत नेऊ शकते. उपचार करत असताना योग्य निदान. अत्यंत महत्त्वाचा भाग निदान करण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या 1) एक्स-रे 2)गरज भासल्यास एम आर आय 3)संधिवात आहे किंवा नाही इतर कोणते आजार आहात आहेत का हे पाहण्यासाठी काही रक्त लघवीच्या तपासण्या गरजेनुसार कराव्या लागतात. 90 टक्के पाठ दुखी आजार चार ते सहा आठवड्यात पूर्ण बरे होतात. बहुतांशी रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागत नाही. एखाद्याला सर्दी खोकला असेल तर तो गोळ्या औषधाने बरा करता येतो. पण पाठ दुखी हा बहुतांश मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काम करतो त्याचा सरळ परिणाम पाठीवर अर्थात पाठीचे स्नायू व मणक्यावर होतो.केवळ वेदनाशामक औषधे घेणे पूर्ण चुकीचे आहे.वेदनाशामक औषधे घेतल्यामुळे तात्पुरता बधिरपणा निर्माण होतो. अशा परिस्थितीत वाकून वजन उचलल्यास किंवा खूप काम केल्यास साधी पाठ दुखी उग्ररूप धारण करू शकते. त्यासाठी उपचार हे मूळापासून घ्यायला हवेत. रोगाचे मूळ दाखवल्यास 50 टक्के काम आपोआप होऊन जाते. एखाद्या रुग्णास साखर आहे, म्हणजे डायबिटीस आहे त्याला आपण साखर कमी होण्यासाठी औषधे दिले तर, तो रुग्ण घरी जाऊन औषधे ही खाणार असेल आणि दररोज भरपूर गोड गुलाबजाम आणि जिलेबी खाणार असेल तर, त्याचे साखर नियमित राहणार नाही म्हणजे साखर न खाणे किंवा गोड न खाणे डायबिटीज चे मूळ तत्त्व आहे.पाठ दुखी किंवा मान दुखी सुद्धा पथ्य न पडल्याशिवाय नियंत्रणात येत नाही.पाठ दुखी किंवा मान दुखी हा बहुतांश मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. रोजच्या बसण्या उठण्याची निगडित आहे. त्यामुळे पथ्य देखील मेकॅनिकल आहे.

पाठ दुखी वर उपाय

1) झोपताना सपाट आणि कडक अंथरुणावर झोपावे.2) एका अंगावर किंवा पाठीवर झोपा पण पालथे झोपणे टाळावे.३) झोपून उठताना प्रथम एका कुशीवर होऊन हाताचा आधार घेऊन उठावे नंतर बेडवरून खाली पाय सोडावे 4)एखादी वस्तू उचलताना कमरेतून वाकून उचलू नये,थोडेसे गुडघ्यात वाकून उचलावे. 5) एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका,नियमित वेळेने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरड करा किंवा फिरून या 6)गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रमाणे सीट ठेवा 7) पाठदुखी असेल तर उंच टाचेच्या चपला टाळा.पाठदुखीच्या उपचारांमध्ये विश्रांतीला फार महत्व आहे. आपल्या शरीरामध्ये निसर्गाने प्रतिकारशक्ती जन्मताच निर्माण केलेली आहे पण तिला चालना देणे, विश्रांती आवश्यक आहे जसे एखाद्या हाड मोडल्यानंतर त्याला प्लास्टर मध्ये ठेवल्यास ते आपोआप जुळते पण ते जुडण्यास 4-6 आठवडे कालावधी लागतो तो कालावधी आपल्या गरजेनुसार बदलता येत नाही. तसेच पाठ दुखी बरी करण्यासाठी चार सहा आठवडे विश्रांती घेतल्यास पाठ दुखणे कमी होते हे उपाय करून सुद्धा पाठ दुखी बसत नसेल तर डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

x