अष्टविनायक दर्शन कसे करावे Ashtavinayak Ganpati Darshan

अष्टविनायक दर्शन कसे करावे

गणपती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. अष्टविनायकाचे दर्शन म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतीच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. हे मंदिर रांजणगाव, मोरगाव,थेऊर,लेण्याद्री,ओझर,सिद्धटेक पाली,महाड येथे वसलेले असून यापैकी पाच अष्टविनायक मंदिर हे पुणे जिल्ह्यात असून उरलेले दोन रायगड जिल्हा मध्ये स्थित आहे.

अष्टविनायक दर्शन कसे करावे?Ashtavinayak Ganpati Darshan

अष्टविनायक म्हणजे गणपतीची आठ देवळे आहेत. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत.अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांनी मिळून तयार झाले अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कारण विद्येचे दैवत असलेले गणपती हे सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतात. हे सर्व मंदिरे निसर्गरम्य ठिकाणे आहेत. या प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहेत. देवळांमध्ये मोरेश्वर ,महागणपती चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर,सिद्धिविनायक बल्लाळेश्वर वरदविनायक अशी वेगवेगळी नावे आहेत चला तर मग अष्टविनायकाचे दर्शन घेऊया.

Ashtavinayak Ganpati Darshan

1) मोरगावचा श्री मयुरेश्वर पहिला गणपती– मोरगाव हे पुण्याच्या आग्नेय दिशेला स्थित आहे ते पुण्याहून सासवड जेजुरी मार्गे केवळ दोन तास अंतरावर आहे. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगाव येथील श्री मयुरेश्वरा च्या दर्शनाने केला जातो. पहिला गणपती मयुरेश्वर ते आठवा गणपती महागणपती या प्रमाणे यात्रा केली तर सर्व गणपती चे दर्शन आपणास होईल.मोरगाव जवळच पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर, जेजुरी चे श्री मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिर तसेच सासवड येथील संत सोपान महाराजांचे समाधी हे प्रेक्षणीय आणि प्रसिद्ध स्थळे सुद्धा आपण पाहू शकता.

2) सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर दुसरा गणपती-मोरगाव हुन दोन तासाच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोहोचण्यासाठी चौफुला पाटस मार्गे प्रवास करावा लागतो. सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फूट आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड उजवीकडे आहे. Ashtavinayak अष्टविनायकापैकी हा एकच गणपती ज्याची सोंड उजवीकडे आहे जवळपास नऊ किलोमीटर अंतरावर पेडगाव येथील भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ले आहेत.

3) पालीचा श्री बल्लाळेश्वर तिसरा गणपती- पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक पाषाण बालेवाडी महामार्ग हा मार्ग दोन तासाच्या अंतरावर आहे एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. हे मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फूट उंच आहे जवळच सरसगड नावाचा किल्ला भोयरा देवीचे देऊळ तसेच काही अंतरावर गरम पाण्याचे झरे असलेले उन्हेरे हे स्थळ सुद्धा आहे.

4) महाडचा श्री वरद विनायक चौथा गणपती- पालीपासून दोन तासाच्या अंतरावर वरद विनायक महाड चा गणपती आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून वरद्विनायक ओळखले जातात. मंदिरामध्ये दोन मुरत्या दिसतात. एक गाभार्‍याच्या बाहेर आणि एक गाभार्‍याच्या आतील मूर्ती ही शेंदूर ने माखलेले असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी मूर्ती ही शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे.

5) थेऊरचा श्री चिंतामणी हा पाचवा गणपती- थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे हे मंदिर खोपोली जुना मुंबई पुणे महामार्ग खंडाळा च्या थोड्या आधी आहे. थरूर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे. चिंतामणीचे मूर्ती पूर्वाभिमुख असून गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्नजडित आहेत. थेउर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केले त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती जवळच असलेल्या मुळा मोठा नदी दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्यांना सिद्धी प्रदान केली.

6) लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक सहावा गणपती लेण्याद्री चा डोंगरावर श्री गिरिजात्मक मंदिर आहे नाशिक फाटा चाकण राजगुरुनगर नारायणगाव जुन्नर या मार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे.ह्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तीनशेपेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी मूर्ती ही उत्तराभिमुख आहे म्हणजेच प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. ह्या मूर्तीच्या सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आहे.

7) ओझरचा श्री विघ्नेश्वर सातवा गणपती लेण्याद्री पासून वीस किलोमीटर अंतरावर असणारे ओझर चा विघ्नेश्वर हे देऊळ आहे ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत पहिल्याने चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे या द्वारपालाच्या हातातील शिवलींग हे सूचित करते की गणपतीच्या भक्ताने सुद्धा स्वतःच्या आई वडिलांचा आधार राखला पाहिजे. जवळच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आर्वी हे उपग्रह केंद्र तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण बसवलेले ठिकाण म्हणजे खोदळ

8) रांजणगावचा श्री महागणपती आठवा गणपती पुणे-अहमदनगर मार्गावर ओझर पासून दोन तास अंतरावर मंदिर स्थित आहे हे पूर्वाभिमुख मंदिर असून सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी सिद्धी त्याच्या सोबत आहेत हा गणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशोत्सवात रांजणगावच्या गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाही तर त्या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात अशाप्रकारे आपण अष्टविनायकाचे दर्शन घेउ शकता.गणपती बाप्पा मोरया….

Leave a Comment

x