आरोग्य विभागातील गट-क व गट-ड पदांची लेखी परीक्षा दिनांक जाहीर Arogybharti2021 Exam Date Declared

आरोग्य विभागातील गट-क व गट-ड पदांची लेखी परीक्षा दिनांक जाहीर

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी www. arogybharti2021.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते.

आरोग्य विभागातील गट-क व गट-ड पदांची लेखी परीक्षा दिनांक जाहीर Arogybharti2021 Exam Date Declared

गट क पदांचा निकाल Result पाहण्यासाठी  येथे क्लिक करा

यानुसार गट-क आणि गट-ड संवर्गातील लेखी परीक्षा दिनांक 25/9/2021 व 26/ 9/2021 रोजी घेण्यात येणार होती पण आदल्या दिवशीच परीक्षा रद्द झाल्यामुळे आता ही परीक्षा गट क पदासाठी 24/10/2021 तर गट ड पदासाठी 31/10/2021 रोजी होणार आहे. परीक्षेच्या दिनांकाच्या एक आठवडा अगोदर उमेदवारांना वरील संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेल्या प्रवेश पत्रावर माहिती मिळेल.

गट क सवर्गासाठी परीक्षेचे स्वरूप

1 ज्या पदांसाठी शैक्षणिक अहर्ता किमान पदवीधर आहेत या पदांसाठी मराठी भाषा विषय प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमांमध्ये असतील.

2 गट क पदा करता 100 प्रश्न असलेले 200 गुणांची ओ एम आर उत्तर पत्रिका पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.

3 सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण 100 प्रश्नांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात येतील.

4 लिपिक वर्गीय पदाकरता मराठी इंग्रजी सामान्‍य ज्ञान व बौद्धिक चाचणी एकूण शंभर प्रश्न 200 गुण देण्यात येतील.

5 निम वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील पदाकरता इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण 60 प्रश्न करता 120 गुण व पदा सबंधी 40 प्रश्नांस 80 गुण असे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल.

6 गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी हा दोन तासांचा असेल

7 उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परीक्षा देखील घेण्यात येईल

गट ड वर्गासाठी परीक्षेचे स्वरूप

1 सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न जास्तीत जास्त दोन गुण देण्यात येतील एकूण शंभर गुणांची परीक्षा असेल

2 गट ड संवर्गातील परीक्षेचा कालावधी हा दोन तासाचा असेल.

Leave a Comment

x