12 वी नंतरची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थ्यांना ओढ लागली आहे ती म्हणजे बारावी नंतर कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा. यंदा प्रवेश घेण्यासाठी नेमकी प्रोसिजर काय असणार. बारावी नंतर पुढील उच्चशिक्षणासाठी साधारणता CET म्हणजेच प्रवेश प्रक्रिया परीक्षा द्यावी लागते परंतु या वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
12 वी नंतरची प्रवेश प्रकिया आजपासून सुरू Admissions after 12 th
उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रवेश परीक्षा म्हणजेच CET घेण्यात येणार नाही त्याऐवजी विद्यार्थ्यांना बारावीच्या मार्क्स वर कॉमर्स,सायन्स आणि आर्ट्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यासंबंधीची प्रक्रियाही आजपासून सुरू होत आहे. दरवर्षीच्या बारावीच्या निकाला पेक्षा या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी सीईटी ही घेण्यात येणार नसून मात्र विविध अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम याकरिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र CET देणे अनिवार्य असणार आहे. फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरू होणाऱ बद्दलचा निर्णय आठ दिवसात घेणार असल्याचे म्हटले जात आहे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगली परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असतील असेही उदय सामन्त यांनी म्हटले आहे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना संपूर्ण शुल्क माफ असणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
या निर्णय मुले विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मार्ग मोकडा झाला आहे.