उन्हाळ्यात वाढते पित्त (ऍसिडिटी) वर उपाय
सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि स्वास्थ्य बद्दल अधिक जागृत राहणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त Acidity असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. पित्ताची लक्षणे- छातीत जळजळ, तोंड येणे आणि दाह. शरीरात जी उष्णता वाढते तेव्हा आपल शरीर उच्चतम पातळीवर आम्ल निर्मिती करतात. हे वाढते पित्त कमी करण्यासाठी आपल्याला आहारात काही बदल करावे लागतील.
उन्हाळ्यात पित्त(ऍसिडिटी) वर उपाय Acidity
1)आपल्या शरीरातील पाणी आणि पीएच पातळी सुयोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी,लिंबू सरबत,कोकम सरबत,थंड ताक आदि द्रवपदार्थ जास्तीत जास्त घेतले जाणे महत्त्वाचे आहे.
2)आहारातील थंड दुधाच्या समावेशाने पोटातील अतिरिक्त आम्ल शोषले जाते. थंड दुधात एक चमचा सबजा पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरतो.
त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दूध आणि ताक यांचा समावेश करावा.
३) फळा नैसर्गिक स्तरावर अँटी अक्सिडेंट आहेत शिवाय भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिज यामुळे ती ऊर्जानिर्मिती करतात. पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबर युक्त फळे सर्वोत्तम ठरतात आणि खास करून उन्हाळ्यात त्याचा चांगला फायदा मिळतो.
4) दुधीभोपळा, कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्या त्यांच्यातील पाण्याचा आणि खनिजाच्या अंशामुळे फायदेशीर ठरतात. शरीराच्या शरीराचे पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी खासकरून उपयुक्त ठरते. शिमला मिरची यामुळे नैसर्गिक स्तरावर पोटातील आम्ल वर परिणाम होतो. उन्हाळ्यामध्ये सलाड आणि भाज्यांचे गार सूप अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.
5) गुळ मोसमासाठी चांगला असतो. गुळाचे पाणी तुमच्या पित्तावर आणि पित्ताच्या लक्षणावर अतिशय परिणामकारक ठरते चिमूटभर मीठ घातलेले तुळशीची पाने असलेलं लिंबू पाणी घोट घोट घेत राहणे. ताजा ऊस खाणं त्यामुळे शरीरातील वाढलेले तापमान कमी होते. आंब्या सारखे उन्हाळ्यात मिळणारी फळे ही जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहेत खरबूज कलिंगड हे फळेसुद्धा पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चे उत्तम स्त्रोत आहेत. केळी हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरल्या जाते.