आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना,आरोग्य योजना

आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

राज्यात परिपूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.ग्रामीण व शहरी भागात दर्जेदार आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागामार्फत अनेक योजना व उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील दुर्गम व अतिदुर्गम भागात शेवटच्या घटकांपर्यंत गुणात्मक आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी जिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,आरोग्यवर्धिनी केंद्र,मोबाईल मेडिकल युनिट कार्यरत आहेत तसेच शहरी भागात दर्जात्मक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मोटार बाईक ॲम्बुलन्स मोबाईल मेडिकल युनिट कार्यरत आहे. चला तर राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा आढावा घेऊया.

मोटार बाईक ॲम्बुलन्स

मुंबई शहरातील नागरी दाट वस्ती मध्ये अरुंद रस्ते ज्या भागांमध्ये मोठी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाहीत,अशा ठिकाणी रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोटरबाईक ॲम्बुलन्स सुरू करण्यात आली.यामध्ये रस्त्यांवरील अपघात सर्व गंभीर स्वरूपाचे रुग्णांना नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण हृदय रुग्ण, विषबाधा,गंभीर आजार सर्व प्रकारचे आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात.आपत्कालीन परिस्थिती 108 या टोल फ्री क्रमांकावर सेवा देणार्‍या बाईक ॲम्बुलन्स विशेष बाब म्हणजे यांचा वाहनचालक स्वतः एक आरोग्य अधिकारी असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने प्रथम उपचार दिला जातो.त्यामुळे रुग्णाला होणारे गंभीर इजा टळते व मृत्यूच्या प्रमाणात घट होते.या मोटर बाईक ॲम्बुलन्स साठी विशेष किट तयार करण्यात आली असून त्यामध्ये आवश्यक असलेली उपकरणे व औषधांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आपत्कालीन किट, एयर वे किट,ट्रोमा किट व अग्निरोधक इत्यादी गोष्टीने ही रुग्णवाहिका सुसज्ज करण्यात आली आहे.

मोबाईल मेडीकल युनिट

मोबाईल मेडीकल युनिट सेवा राज्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात तसेच शहरी भागातील झोपडपट्टी भागात आरोग्य सेवा पासून वंचित लोकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये नागरिकांना अत्यावश्यक प्राथमिक आरोग्य सेवांश निदानात्मक सुविधा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले मोबाईल मेडीकल युनिट हे जनतेसाठी वरदान ठरले आहे.

प्रेरणा प्रकल्प

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढते प्रमाण लक्षात घेता नैराश्य ग्रस्त शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे.एकूण 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी समुपदेशन आरोग्यसेवा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत आशा कार्यकर्ती गावातील घरांचे सर्वेक्षण करून नैराश्यग्रस्त रुग्ण शोधतात व गावातील जोखमीचे कुटुंब ओळखतात त्यानंतर तज्ञांकडून समुपदेशन वर्गीकरण करून प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व अति जोखमीचे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात 108 रुग्णवाहिका मार्फत रुग्णांना संदर्भित करण्यात येते.

आरोग्य वर्धनी केंद्र

राज्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी आरोग्य वर्धनी अंतर्गत टप्प्याटप्प्याने राज्यातील दहा हजार 668 उपकेंद्रांची, 605 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व 1828 ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य वर्धनी केंद्रमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. या केंद्रांमध्ये लोकांना आरोग्य प्रतिबंधात्मक प्रबोधनात्मक व उपचारात्मक आरोग्य सेवा न बरोबर औषधोपचार, प्रयोगशाळेत तपासणी यासारख्या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रसुतीपूर्व व प्रसूती सेवा नवजात व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा,बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्यक आरोग्यसेवा संसर्गजन्य रोग नियोजन व तपासनी, मानसिक आरोग्य नियोजन व तपासणे नाक कान घसा डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत व मुखरोग आरोग्य सेवा वाढत्या वयातील आजार व परी हारक उपचार प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा आयुर्वेद व योगा अशा एकूण तेरा प्रकारच्या आरोग्य सेवांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x