दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 10th 12th Exam Timetable

दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 10th 12th Exam Timetable

त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अभ्यास केला तर परीक्षा ही व्हायला हवी. यापूर्वीच परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे. तर दहावीच्या बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.परंतु आता बोर्डाकडून परीक्षेच्या प्रत्येक विषयानुरूप सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण वेळापत्रक बघायचे असेल तर बोर्डाच्या www.mahasscboard.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बुधवार 4 मार्च 2022 ते बुधवार 30 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या(HSC) परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक (timetable) पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा

इयत्ता बारावी(HSC) आणि इयत्ता दहावी(SSC) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक श्रेणी व तोंडी अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील लेखी परीक्षा 4 मार्च ते7 एप्रिल 2022 ह्या कालावधीत होतील तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाइन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असेल प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आउट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च 21 एप्रिल 2012 या कालावधीत घेण्यात येतील covid-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वेळापत्रक पाहून आपल्या विषयानुरूप अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे

Leave a Comment

x