फळांचे औषधी उपयोग Use of Fruits in marathi

फळांचे औषधी उपयोग

रोजच्या दैनंदिनी मध्ये आपण आहारामध्ये फळांचा समावेश करीत असतो. फळांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. प्रत्येक मोसमामध्ये आलेले फळ खाणे हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. कोणत्या फळांमध्ये कोणते गुणधर्म असतात हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आंबा, केळी, पपई, चिंच, चिकू, मोसंबी,स्ट्रॉबेरी, अंजीर, आवळा,ड्राक्षे, लिंबू जांभूळ, डाळिंब, बोरे अशा अनेक फळांचा आपण आहारामध्ये समावेश करतो. त्यापैकीच काही फळांची माहिती म्हणजेच त्यामध्ये असणारे गुण सुद्धा आपण जाणून घेऊया.

केळे

केळ शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. केळांमुळे वजन वाढते हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो. आहारामध्ये एक ते दोन केळी चा समावेश केल्यास त्याचा खूप फायदा होतो.

डाळिंब

डाळिंबात अनेक औषधी गुण असतात. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते अपचन दूर होते, आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या त्याचा विकार बरा होतो. कावीळ झाला असेल तर यावर हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळिंबाचा रस पासून तयार केलेले चाटण लहान मुलांचा खोकला बरा करते.फार जर बोलत असाल तर बोलण्याने आवाज बसतो. डाळिंब खाल्ल्यास तो आवाज सुधारतो.

जांभूळ

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळाचा पानाचा रस आणि साले पासून काढलेला काडा घेतल्याने अतीसारला प्रतिबंध होतो.जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे परंतु ते तज्ञ व्यक्ती व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. संडास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात ही साल चांगली तीन तोळे घेऊन पाण्यात एक अष्टमांश काढा करावा व त्यात अर्थया तोडे तूप,तीन मासे दूध पासून केलेला काढा घेतल्यास अतिसार थांबते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक घोट पाण्याबरोबर घ्यावे. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड आलेले कमी होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे शरीरातील रक्त शुद्ध करीत असते.

पपई

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. जंतावर हे एक चांगले औषध आहे. पपईचा चीक गचकरण खरूज, नायटा अशा त्वचा रोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. पपईचा चिक आणि मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर दिवसातून दोन वेळेस द्यावा त्यामुळे जंत पडून जातात. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये त्यांना ती अपायकारक असते.

आंबा

फळांचा राजा म्हणजे आंबा. तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे,अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण आहेत. शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो यावरून आपल्या लक्षात आले असेल उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. अतिसार म्हणजे वारंवार संडास होणे या व्याधीवर आंब्याची साल उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते अंजीरातून शरीराला लोह व्हिटॅमिन्स ए बी सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. त्याच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते, तसेच पित्त विकार रक्तविकार व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात. अपचन आणि ऍसिडिटी,गॅसेस चा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ संध्याकाळ एक ते दोन अंजीर खावेत किंवा त्याचा रस प्यावा त्यामुळे वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते अंजीर खाल्ल्याने अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यानंतर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते ओली आणि सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

आवळा

आवळा हे फळ बहुगुणी आहे.ते मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात याशिवाय अंगावर कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी.

ऊस

ऊस खाने , उसाचा रस घेणे आपलयाला आवडते. ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते, तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यास तो त्रास कमी करते.कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा, चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते .ऊस हा थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे रस्त्यात गाडीवर मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो.

द्राक्ष

द्राक्ष हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे ,घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा ,उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे गुणकारी आहेत. मूठभर द्राक्ष व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावे व सकाळी कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका हा उपयुक्त आहे. दररोज सकाळी उठून तीन-चार मनुके जर खाल्ले तर भूक वाढते अन्न पचन होते आणि शक्ति येते. घसा बसणे कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय किंवा छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

बोरे

आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम,प्रोटीन, कार्बोहायड्रेट,इत्यादी जीवन सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण,वातविकार,यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते.मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. नेहमी प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या.यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते, हे सर्वात स्वस्तच प्रभावी ब्रेन टॉनिक होऊ शकते.बी काढलेले बोरे जळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून मलम तयार करा हे मलामचेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.

स्ट्रॉबेरी

आंबट किंचित गोड जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण मळमळ अपचन होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी.स्ट्रॉबेरी वर पाणी पिऊ नये रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहा बरोबरच स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात. छातीत धडधड भीती वाटणे आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर यांचे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पाणी पिऊ नये.उपयोग उत्तम होतो स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत त्याने आम्लपित्त त्वचा विकार मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.

लिंबू

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. या आजारवर लिंबू फार उपयुक्त आहे.लिंबू आडवे कापून त्यावर सूट किंवा सैंधव मीठ घालून निखार्‍यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे, त्यामुळे करपट ढेकर, ओकारी पोटफुगी, वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते व अन्न पचते व शौचास साफ होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी किंवा ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला खाज सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व स्वच्छ पाण्याने स्नान करावे. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो. असे अनेक फळे आहेत की ज्यामध्ये औषधी गुण आहेत या फळांचा नियमित सेवन केल्यास आपल्या आरोग्य उत्तम राहील जर फळांचा ज्यूस किंवा फळे जेवणाच्या वेळेस घेतल्यास आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होते तेव्हा मित्रांनो आजपासून रोज फळांचे सेवन करा आणि उत्तम आयुष्य जगा.

डाळिंब

डाळिंबात अनेक औषधी गुण आहेत.डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते.अपचन दूर होते . काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळिंबाचा रस मध साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

Leave a Comment

x