असांसर्गिक आजार म्हणजे काय?

असांसर्गिक आजार म्हणजे काय?

असंसारगिर्क आजार हे दीर्घकाळपर्यंत टिकणारा आजार आहे. परंतु हा असा आजार आहे की यांचे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होत नाही. यामधील काही आजारांचे लक्षणे हळूहळू समोर येऊन नंतर ती लक्षणे दीर्घ काळपर्यंत राहतात. त्यामुळे आजाराचे खूप काळपर्यंत व नियमित काळजी व उपचाराची गरज असते. यामध्ये काही आजार असे असतात की त्याची लक्षणे अधिक वेगाने दिसून येतात. यामध्ये वयस्कर स्त्री आणि पुरुष प्रभावित होतात. तसेच लहान मुलांना देखील आजार राहू शकतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना हे वरून आरोग्यदायी दिसत असतात. असांसर्गिक आजारासंबंधी सर्वात धोक्याची बाब ही आहे की हे आजार मनुष्याच्या जीवनातील महत्त्वाच्या कालावधीमध्ये होतात. ज्यामुळे अकाली मृत्यू सुद्धा होतात. हे असांसर्गिक आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतात. तथापि वृद्धापकाळात मध्ये हे आजार होण्याची शक्यता जास्त असते .

पाच प्रमुख असंसर्गीक आजार

1उच्च रक्तदाब
2 मधुमेह
3 गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
4 स्तनाचा कर्करोग
5 तोंडाचा कर्करोग
असांसर्गिक आजारामध्ये जसे की फिड्स,दमा, अस्तमा व शोषण संस्थेचे आजार हे सुद्धा असांसर्गिक आजार आहेत.असांसर्गिक आजाराचे धोके व त्यांचे प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी समाज जनजागृती करणे ही आज काळाची गरज आहे. असांसर्गिक आजारासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तुमच्या कार्यक्षेत्रातील आजाराचे लवकर निदान करणे उपचार करणे महत्त्वाचे ठरते. समाजातील कुटुंब आणि व्यक्तींना या आजाराचा कारणीभूत असलेल्या कारणांची माहिती सविस्तर पण देणे आणि आरोग्यविषयक प्रोत्साहन देणे आवश्यक ठरते.

असांसर्गिक रोगाच्या धोक्याचे घटक

हा असंर्गिक आजार वाढवण्यासाठी उद्भवणारी परिस्थिती आणि व्यवहार ज्याला असांसर्गिक रोगाच्या धोक्याचे लक्षण मानतात.असांसर्गिक रोगासाठी कारणीभूत असलेल्या परिस्थिती बघितल्या सांसर्गिक रोगासाठी कारणीभूत परिस्थिती चे दोन प्रकार होऊ शकतात. एक परिवर्तन बदल हे बदलू शकतात आणि दुसरे म्हणजे अपरिवर्तनीय ह्या बदलू शकत नाहीत.

अपरीवर्तन बदल असलेल्या धोक्याची कारणे

व्यक्तीच्या स्वभाव एक आणि आंतरिक बदल असते जे बदलू शकत नाही. जे वय लिंग आणि कौटुंबिक इतिहासाची संबंधित असते. जसजसे वय वाढते तसतसे आपल्या शरीरात बदल होते.वय वाढल्यावर रक्तदाब वाढणे म्हणजेच हायपरटेन्शन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त वाटते. ज्यामुळे असंसार्गिक रोगाचे प्रमाण वाढ प्रमाणात वाढ होते. जसे हृदय रोग, लखवा मारणे मधुमेह, कॅन्सरचं रोग इत्यादी. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असांसर्गिक रोगाचा धोका आहे. परंतु स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे धोके व प्रमाण अधिक असते. तर स्त्रियांमध्ये स्तनाचे कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असते.तसेच ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी सुरू आहे त्यांच्या तुलनेत मासिक पाळी बंद असलेल्या स्त्रियांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त असते. काही असांसर्गिक आजार हे महिलांमध्ये गरोदरपणात प्रभावित करते. जसे उच्च रक्तदाब, जास्त साखरेचे प्रमाण वाढणे जर कुटुंबातील जवळच्या मोठ्या लोकांना जसे आई-बाबा आजी-आजोबा बहिण-भाऊ यांना जे आजार असतील तर कुटुंबातील इतरांनाही असांसर्गिक आजार होण्याची शक्यता वाढते यालाच कौटुंबिक आनुवंशिकता म्हटले जाते.

परिवर्तन म्हणजेच बदलणारे धोक्याचे कारणे

या अशा जोखमीच्याच्या परिस्थिती आहे ज्या बदलता येतात. कोणत्याही विशिष्ट वागणूक सवय किंवा आरोग्यदायी जीवनशैली यामुळे त्याच्या परिणामांची तीव्रता कमी करता येते. काही सवयी जसे कमी शारीरिक हालचाली किंवा व्यायामाचा अभाव, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, दारू पिणे हे कोणत्याही व्यक्तीवर प्रभाव टाकू शकते.हे जास्त लोकसंख्या असलेल्या समाजाच्या स्तरावर सुद्धा होऊ शकते. जसे घरीबी काम करण्याची किंवा राहण्याची निकृष्ट स्थिती अथवा पर्यावरणातील धोके इत्यादी. वैयक्तिक स्तरावर काही परिवर्तन या धोक्याची परिस्थिती बदलेल येत आहे. ते एखाद्या व्यक्तीने जर स्वतःच्या वर्तनात बदल घडविले तर ते शक्य होते. तथापि काही परिस्थितीमध्ये अशा वर्तनाला बदलण्यासाठी कायद्याचे व शासकीय कारवाईची गरज असते. उदाहरणार्थ शाळेजवळ पानटपरीवर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी. रहिवाशी क्षेत्रांमध्ये औद्योगिकीकरण यावर दंड करून पर्यावरण कमी करणे.

आज असांसर्गिक आजार का वाढत आहेत

गेल्या काही वर्षातील माहितीवरून असे निदर्शनास आले आहे की,असंर्गिक आजारांमध्ये वाढ झालेली आहे.त्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जास्त प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. ज्यामुळे त्यांचे भोजन,राहनीमान इतर वर्तन आणि जीवनशैलीत बदल होत आहेत.लोकांचे आयुर्मान वाढल्याने वृद्धांची संख्या वाढली आहे.वाहनाच्या उपलब्धतेमुळे चालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नियमित व्यायाम करण्याकरता आवश्यकतेनुसार ठिकाण आणि जागेची उपलब्धता नसणे. सर्व वयोगटातील लोकांना सहजतेने तंबाखू आणि तत्सम पदार्थ आणि दारू उपलब्ध होत आहे.त्यामुळे व्यसनात वाढवत आहे. चरबीयुक्त आणि गोड आणि मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन अधिक वाढले आहे. पालेभाज्या फळांचा उपयोग आहारात कमी होत आहे. रिफाईन तेलाच्या खाद्यपदार्थाच्या सेवन वाढले आहे. तसेच वातावरणातील प्रदूषण वाढले आहे.

असांसर्गिक आजाराविषयी समज गैरसमज

सामान्यता लोकांची अशी धारणा आहे की असांर्गिक आजार हे श्रीमंत लोकांचा आजार आहे.परंतु हे खरे नाही. गरीब आणि वंचित लोकांमध्ये देखील या आजाराचे संभावना तेवढेच असते. गरिबी आणि कुपोषण हे दोन महत्त्वाचे कारण आहे. ज्यामुळे हे आजार होतात. आपणास माहीतच आहे की, बहुतांश मुलांचे जन्माचे वेळी वजण हे सामान्य वजनापेक्षा कमी असते. गर्भामध्ये नवजात बाळाला पुरेसे पोषण मिळाले नाही तर त्याचे परिणाम तिच्या बाळावर नंतरच्या काळात पडतात. अशी बालके चरबीयुक्त पदार्थ आणि गोड पदार्थ ला योग्य पद्धतीने पचवु शकत नाहीत.ज्यामुळे अशा बाळांमध्ये आजार होण्याची परिस्थिती वाढते.

यांच्याशी उच्च रक्तदाब चरबीचे वाढण्या साखरेचे प्रमाण वाढणे इत्यादी. गरिबी हे अनेकांना असांसर्गिक आजार होण्यास कारणीभूत आहे. ज्यामध्ये आईला होणारे कुपोषणाचा समावेश आहे. तसेच गरीब लोक हे पोषक पदार्थ उदाहरणार्थ ताजी फळे विकत घेण्यास असमर्थ असतात. ज्यामुळे ते केवळ भाकर,भात खातात.सोबत फडे आणि पालेभाज्या घेत नाही.तसेच शहरी भागातील गरीब हे खूप वेळपर्यंत काम करीत असल्यामुळे भाजी व पोषक पदार्थ वगैरे बनविण्यास वेळ देत नाहीत. काही कामगार अशा ठिकाणी राहतात. जिथे वायू प्रदूषणाची शक्यता अधिक राहते. जसे कारखान्याजवळ त्याठिकाणी घातक प्रकारचे प्रदूषित वायू असतात.

ज्यामुळे आम्ही बघतो की गरीबांमध्ये असांसर्गिक आजाराचे प्रमाण बळावते. त्या श्रीमंत लोकांच्या तुलनेमध्ये ज्यांच्याकडे आरोग्याची काळजी घेण्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा आहे. असांसर्गिक आजार जास्त खर्चिक असून खूप वेळपर्यंत उपचार घ्यावा लागतो. यासाठी लागणारा खर्च जास्त असून या आजारात सोबत जर जगत असलेल्यांना तर औषध बंद करणे देखील शक्य होत नाही. जरी त्यांना बरे वाटत असले तरी देखील तुम्हालाही औषधी नेहमी घ्यावी लागते. ज्यामुळे आजार पण नियंत्रणात राहील. परंतु बरेचसे लोक थोडे बरे वाटायला लागले की औषधे बंद करतात किंवा पैसे ते पैसे कमी असल्यावर औषधे बंद करतात.

हा आजार किती काळ असतो?

म्हणून सेवा प्रदान करणाऱ्यांनी उदाहरणार्थ आरोग्य सेवक,आरोग्य सेविका यांनी अशा लोकांच्या आजारपणावर संनियंत्रण करणे गरजेचे आहे. एखादा गरीब व्यक्ती नियमित आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास जात नाही. कारण त्यामुळे त्याची मजुरी बुडते. दवाखान्यात जाण्या-येण्याचा खर्च वाढतो. श्रमाचे काम करतो त्यामुळे कमजोरी आणि पोषक आहार वर होणाऱ्या खर्चामुळे मानसिकता नाही इत्यादी अनेक कारणे व परिस्थिती आहे ज्यामुळे गरिबांमध्ये असांसर्गिक आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. हा सांसर्गिक आजार हे खूप दीर्घकाळपर्यंत चालते आणि आजारपणामुळे व गुंतागुंतीमुळे रुग्णाला दवाखान्यात भरती सुद्धा व्हावे लागते.

ज्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अशा कुटुंबातील लोकांना आपल्या मुलांना शाळेत शिकविणे आणि संतुलित आहार देणे अवघड जाते. स्त्रियांचे देखील कुटुंबात आणि समाजाची स्थिती दयनीय आणि संवेदनशील होते. त्या अधिकाधिक आरोग्य सुविधेपासून वंचित होत जातात. गरीबी एक प्रमुख कारण आहे जे अशा परिस्थितीला कारणीभूत ठरते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे आरोग्य सेवा पर्यंत पोहोच फार कमी आहे.

कुटुंबातील कुटुंबाच्या मिळकतीवर देखील त्याचा अधिकार नसल्यासारखेच असते. ज्यामुळे उपचार करण्यासाठी त्या स्वतः कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही,तसेच काही समाजामध्ये महिलांनी सर्वात शेवटी उरलेल्यांना खाण्याची प्रथा आहे हे काही आरोग्याच्या ही त्याची सवय नाही. म्हणून समाजातील महिलांमध्ये असांसर्गिक आजाराविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांच्यात जाणीव निर्माण होईल आणि महिला सांसर्गिक आजाराचे निदान करून घेण्यासाठी आणि उपचारासाठी पुढाकार घेतील.

आरोग्य प्रोत्साहन

आरोग्य प्रशासनाच्या आपल्या जीवनावर आयुष्यभर प्रभाव पडत असतो कमी वयात आरोग्य प्रसारास प्रारंभ झाल्यास त्याचा आरोग्यावर चांगला प्रभाव पडत असतो. आरोग्य जीवनशैली यामुळे आरोग्य स्वतःमध्ये चरबीचे प्रमाण इत्यादी मध्ये सुधारणा होते. निरोगी राहण्यासाठी हे आवश्यक आहे. पोषक युक्त आणि संतुलित आहाराचा रोजच्या जेवणात वापर करणे आणि नियमित शारीरिक व्यायाम करणे व्यक्तिगत स्वच्छता राखने, वजन वाढू न देणे, मानसिक तणावापासून मुक्त राहणे, तंबाखू,दारू बीडी या व्यसनांपासून दूर राहणे.आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये मुख्यत व आरोग्य संबंधित जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे.

त्यानंतर सुरक्षित व्यवसाय,सुरक्षित पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण, योग्य पोषण यांमध्ये सकस आणि संतुलित आहार घेणे. योग्य विश्रांती म्हणजेच नेहमी योग्य झोप घेणे, शारीरिक सुदृढता आणि नियमित व्यायाम व्यसनांपासून दूर राहणे, उदारणार्थ दारू, तंबाखू, सिगारेट वैयक्तिक स्वच्छता म्हणजेच आपले संपूर्ण शारीरिक स्वच्छता समाजासोबत सामान्यतेणे वागणे. आरोग्य प्रदूषणाचे एक महत्त्वाचा भाग म्हणजे सकस आणि संतुलित आहार घेणे. तसेच अनारोग्यदायी जीवन टाळणे.

दुसरे सामाजिक पोषक वातावरणात राहणे आणि सुरक्षित व्यवसाय आणि सामान्य बाबींचा सामान्य आरोग्य आणि सुख शांती व महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असते. आपल्या देशात श्रीमंत आणि गरीब लोकांमधील आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असमानता दिसून येते. एकाच प्रकारचे सर्व आरोग्य कार्यक्रम सर्व गटांसाठी योग्य नाही. आरोग्य संबंधित संदेशाला स्थानिक परिस्थितीचा किंवा वर्तणुकीचा तसेच जीवनशैलीनुसार उपचार करण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे समाजात आरोग्याच्या वावरताना संबंधीचा प्रभाव पडत असतात. अशा प्रकारचे
असांसर्गिक रोग आढळत असतील तर आरोग्य केंद्राकडे त्वरीत जाऊन स्वतःच्या तपासण्या कराव्यात. व नेताना अंती उपचार सुरू करावेत

 

 

Leave a Comment

x