मोबाईल नंबर दहा अंकीच का असतो
आपल्याला माहीतच आहे की आपल्याला मिळालेला मोबाईल नंबर दहा आकडीच असतो. पण आपण विचार केला का मिळणारा नंबर 10 आकडीच का असतो.
मोबाईल नंबर दहा अंकीच का असतो why mobile no 10 digit
सन 2003 पर्यंत आपल्या देशात 9 अंकी मोबाईल नंबर होते. आता दहा पैकी एक नंबर चुकला तर आपला कॉल दुसऱ्याला लागू शकतो. एखाद्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करताना एखादा नंबर चुकला तर अनोळखी वक्तीला कॉल लागू शकतो .नंबर योग्य आहे किंवा नाही याची आपण खातरजमा करतो. आज प्रत्येक भारतीय व्यक्तीला दहा अंकी मोबाईल नंबर दिला जातो यामागचे नेमके कारण सुद्धा जाणून घेऊया.
सरकारची राष्ट्रीय नंबरिंग योजना याचे सर्व नियोजन करते मोबाईल नंबर हा एक अंकी असला तर झिरो ते नऊ पर्यंत केवळ दहा व्यक्तींनाच नंबर मिळाला असता. दोन अंकी नंबर दिला असते तर 99 व्यक्तींना नंबर मिळाला असता. सरकारी नंबरिंग योजनेअंतर्गत 10 अंकी मोबाईल नंबर दिल्यास 1 हजार कोटी नंबर्स तयार होतात हाच विचार करून मोबाईल नंबर दहा अंकी देण्यात आला आहे.
दुसरे कारण म्हणजे आपल्या देशाची वाढणारी लोकसंख्या सध्या आपल्या भारताची लोकसंख्या 130 कोटी च्या आसपास आहेत नऊ अंकी नंबर दिले असते तर भविष्यात सगळ्यांना मोबाईल नंबर मिळाला मिळणे शक्य झाले नसते. वाढती लोकसंख्या लक्षात घेता ट्राय ने दहा अंकी मोबाईल नंबर दिले आहेत लँडलाईन फोन लावताना नंबर पुढे शून्य लावण्याची सूचना दिली आहे.