आषाढी एकादशी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर Live दर्शन Vitthal Rukhmini Live Darshan

आषाढी एकादशी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर Live दर्शन

श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रातील एक विख्यात तीर्थक्षेत्र. पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील लाखो वारकरी विविध दिंडीतून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वर आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत वारकरी विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात.

Live दर्शन घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेतात. यावर्षी कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता आषाढी वारी च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरात संचारबंदी ला रविवार पासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

भक्तांना श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे ऑनलाईन दर्शन घेता यावे यासाठी भक्तांसाठी समिती प्रशासनाने व्यवस्था केली आहे.खालील लिंक वर क्लिक करा

विठ्ठल रुख्मिणी लाईव दर्शनाकरिता येथे क्लिक करा 

दरवर्षीप्रमाणेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे.आषाढी एकादशीच्या पहाटे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापूजा होणार आहे.महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमेचे अनावरण माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.त्यानंतर संत कान्होपात्रा चे झाड म्हणून ओळख असलेले तरटीचे झाड वयोमानाने वाळले आहे.त्या ठिकाणी नवीन तरटीचे रोपण मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

Leave a Comment

x