ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलण ठरणार कायदेशीर
वाहतुकीचे नियम (traffic rules) खूपच कडक करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्यावर मिळणारी शिक्षा किंवा दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलण ठरणार कायदेशीर Traffic Rules
गाडी चालवताना मोबाईलवर(mobile) बोलने हा कायद्याने गुन्हा आहे असं केल्याने आढळल्यास वाहतूक पोलिस कारवाई केली जाते. परंतु येणाऱ्या काळात ही कारवाई होणार नाही. गाडी चालवताना फोनवर बोलणे आता गुन्हा ठरणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले आहे.
परंतु त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. लवकरच या विषयाची घोषणा लोकसभेत केले जाईल असे ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी याबाबत बोलताना सांगितले. गाडी चालवताना तुम्ही फोनवर बोलू शकता परंतु बोलत असताना फोन तुमच्या हातात नसावा. hands-free उपकरण उदाहरणार्थ हेडफोन,ब्लूटूथ इत्यादी वापरून तुम्ही फोनवर बोलू शकता.फोनवर बोलताना तुमचा मोबाईल तुमच्या खिशात असावा किंवा बाजूला ठेवलेला असावा या पद्धतीने तुम्ही फोनवर बोलला तर तो गुन्हा ठरणार नाही असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
या परिस्थितीमध्ये वाहतूक पोलीस तुमच्याकडून दंड करू शकत नाही. परंतु पोलिसांनी अशी कारवाई केल्यास तुम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ शकता. गाडी चालवताना फोनवर बोलत आहात म्हणून अटक झाली तरी तुम्ही कोर्टात अपील करू शकता. यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.हा निर्णय रस्ते अपघात कमी करण्याच्या सरकारच्या ध्येयाची सुसंगत आहे असे गडकरी म्हणाले.