जून पासून शिक्षकांना मुख्यालयातच राहावे लागणार
आगामी शिक्षण सत्र पासून म्हणजे जून पासून शिक्षकांना मुख्यालयातच(head office) राहावे लागणार.
जून पासून शिक्षकांना मुख्यालयातच राहावे लागणार Teacher stay head office
शिक्षकांना बेसिक पगाराच्या नऊ टक्के घरभाडे दरमहा प्रत्येकी 400 रुपयांचा व्हीकल अलौन्स दिला जातो. शाळेची गुणवत्ता व पटसंख्या वाढावी यासाठी त्यांनी मुख्यालयातच राहणे बंधनकारक आहे. ग्राम विकास व शिक्षण विभागाने यापूर्वी तसे आदेशही काढले आहेत.
परंतु अनेक जण मुख्यालयाचे शहर तालुक्याच्या ठिकाणी राहतात त्यामुळे अशा शिक्षकांना आता जून पासून घरभाडे व प्रवासखर्च देणे बंद केले जाणार आहे. राज्यातील जवळपास दीड लाख शाळांमध्ये पाहुणे दोन लाखापर्यंत शिक्षक कार्यरत आहे.त्यातील प्रत्येक शिक्षकाला नऊ टक्के घर भाडे दिले जाते तर दरमहा प्रत्येक शिक्षकांना घरापासून शाळेपर्यंत येण्याचा प्रवास खर्च प्रत्येकी 400 रुपये दिला जातो. जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांना त्यांच्या मुख्य कार्यालयात राहण्यासंबंधी च्या सूचना शाळा सुरू होताना जूनमध्ये दिले जातात.
मात्र बहुतेक शिक्षक(Teacher) या गावातील ग्रामपंचायती कडून तथा सरपंच किंवा शाळा व्यवस्थापन समितीकडून त्या ठिकाणी रहात असल्याचा दाखला आणून देतात त्यामुळे शिक्षण विभागाला कारवाई करता येत नाही. मात्र आता त्या दाखल्यांची पडताळणी केली जाणार आहे. मराठी शाळांमध्ये घटलेली मुलांची संख्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गुणवत्ता कमी झाल्याने मुलांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला कल या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक शिक्षकास मुख्यालयातच राहावे लागणार आहे. अन्यथा शासनाकडून मिळणारे सर्व लाभ बंद केले जातील असा इशाराही जिल्हा प्रशासनाने निर्णय दिला आहे.
शिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असून त्यासंबंधीचा शासन निर्णय अनेकदा यापूर्वी ते झाला आहे तरी बरेच जण राहत नाहीत त्यामुळे आता जून नंतर शाळा सुरू झाल्यानंतर सर्वांची माहिती घेतली जाईल जे मुख्यालयात राहत नाहीत त्यांचे घर भाडे प्रवास भत्ता देणे बंद केले जाईल.