तीन हजार पेक्षा जास्त तलाठ्यांची भरती लवकरच Talathi megabharti 2022

तीन हजार पेक्षा जास्त तलाठ्यांची भरती लवकरच

राज्यामध्ये भरपूर प्रमाणात तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. राज्यातील तलाठी(Talathi megabharti 2022) जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात 1000 तलाठ्यांची भरती करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

तीन हजार पेक्षा जास्त तलाठ्यांची भरती लवकरच Talathi megabharti 2022

ऍडव्होकेट अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती.

हवेली तालुक्यात 160 गावांचा समावेश असून अंदाजे चाळीस लाख लोकसंख्या ची वस्ती आहे वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड या कार्यालयामार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरू आहे 160 गावांमध्ये 46 तलाठी कार्यालयात आहेत.

3165 ही पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून या अंतर्गत संबंधित विभागातील तलाठ्यांचे रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे थोरात यांनी सांगितले आता तलाठी भरती लवकरच होत असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

x