ब्रेकिंग दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर SSC HSC exam timetable

ब्रेकिंग दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर

राज्यातील दहावी आणि बारावीच्या(SSC HSC) परीक्षा ही ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

ब्रेकिंग दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर SSC HSC exam timetable

दहावीच्या परीक्षा 4 ते 30 मार्च आणि दहावीची परीक्षा 15 मार्च 4 एप्रिल या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन(Offline) होणार असून दोन वर्षांपूर्वी यामुळे विद्यार्थ्यांचे लेखन वेग कमी झाला आहे हे लक्षात घेता परीक्षेसाठी अर्धा तास जादा वेळ देण्यात आला आहे

राज्यात बारावीच्या(HSC) परीक्षेसाठी 14 लाख 72 हजार 564 तर दहावीच्या(SSC) परीक्षेसाठी 16 लाख 25 हजार 311 आवेदन पत्र प्राप्त झाली आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेला दिली. जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाही ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत. 5 एप्रिल ते 22 एप्रिल या काळात परीक्षा होणार आहेत बारावी साठी एकूण 158 विषयासाठी 356 प्रश्नपत्रिका आणि दहावीच्या 60 विषयांसाठी 158 प्रश्नपत्रिका तयार करण्यात आले आहेत.

शिक्षण मंडळाने ऑफलाईन परीक्षेची पूर्वतयारी सुरू केली आहे यासाठी पावणेदोन लाख कर्मचारी झटत आहेत कोरोणाचा विचार करून आवश्यक काळजी घेतली जात असून झिग झ्याक पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा उपलब्ध असेल तेथेच परीक्षा होणार आहेत. त्यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल त्यांना चांगले वातावरण मिळेल सकाळच्या सत्रातील परीक्षा 10:30 वाजता सुरू होणार आहे आता तर मुलांना दहा वाजून वीस मिनिटांनी प्रश्‍नपत्रिका देण्यात येणार आहे तर दुपारच्या सत्राचे परीक्षा 2:30 वाजता सुरू होईल आणि मुलांना 2:20 यांना प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने अर्धा तासाचा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला आहे.

Leave a Comment

x