रेशनकार्ड चे सर्व अपडेट्स आता मोबाइलवर मिळणार
ग्राहक सेवेत सुलभता आणण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे रेशन कार्डचे संबंधित महत्त्वाचे सर्व अपडेट्स आता एसएमएसद्वारे मिळणार आहेत.
रेशनकार्ड चे सर्व अपडेट्स आता मोबाइलवर मिळणार Ration Card Update
त्यासाठी ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक(mobile नो) रेशन(Ration card) कार्ड ची लिंक करणे आवश्यक आहे. वन नेशन वन रेशन(one nation, one ration) मोहिमेअंतर्गत अन्नपुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि ग्राहक केंद्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी संकेतस्थळ आणि मेरा रेशन कार्ड अप ची निर्मिती करण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क अभावी आणि शहरी भागातील काही ग्राहकांना इंटरनेट हाताळता येत नसल्याने ऑनलाईन माहिती मिळणे त्रासदायक ठरत आहे. हे समस्या लक्षात घेऊन रेशन कार्डचे(Ration card) संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स आता एसएमएस(SMS) द्वारे पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे ज्या ग्राहकांचा मोबाईल क्रमांक रेशन कार्डचे संलग्न नसेल त्यांनी तातडीने हे पूर्ण प्रक्रिया करून घ्यावी.
रेशनकार्ड मोबाईलशी कसे लिंक करणार(how to ration card link to mobile)
1) ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून आपण घरबसल्या आपले रेशन कार्ड मोबाईलशी लिंक करू शकता सर्वप्रथम https:/nfsa.gov.in/state/MH या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2) तेथे अपडेट युवर रजिस्टर मोबाईल नंबर असा पर्याय दिसेल त्याखाली चार बॉक्स पाहायला मिळतील.
3) आधार कार्ड नंबर ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड /nfs आयडी या पहिल्या बॉक्समध्ये कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक टाकावे लागेल.
4) पुढच्या बॉक्स मध्ये रेशन कार्ड नंबर लिहावा लागेल तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव नमूद करून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो तुम्हाला टाकावा लागेल.
5) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेव(save) वर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल रेशन कार्ड चे मोबाईल नंबर अपडेट(update) झाला तर सर्व शासनाच्या ज्या काही योजना तुम्हाला मिळतील त्याचे अपडेट एसएमएसद्वारे(SMS) दिले जातील.
Nileshrikrishna@gmail
Shrikrishna Nile
Anandawadi
Parali
Beed
9854228222