भारतीय रेल्वेमध्ये 2400 पदांची मेगा भरती Railway Recruitment 2022

भारतीय रेल्वेमध्ये 2400 पदांची मेगा भरती

महाराष्ट्रात रेल्वेने(Railway) मोठी भरती आयोजित केलेले आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल(RRC) आर आर सी ने सेंट्रल रेल्वे मध्ये अप्रेंटिस भरती 2022 चे नोटिफिकेशन जारी केली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये 2400 पदांची मेगा भरती Railway Recruitment 2022

दहावी पास उमेदवारांसाठी तसेच आयटीआय(ITI) झालेल्या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्याची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. साधारणपणे 2400 पेक्षा अधिक जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

जर तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क दहावी(10th) पास झालेले असेल तर नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी rrccr. com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. संबंधित ट्रेड मध्ये तुम्ही जर आयटीआय पास झालेले असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया 17 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे तुम्हाला 16 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे मुंबई क्लस्टर मध्ये 1659 पदे, भुसावल प्लास्टर मध्ये 418 पदे, पुणे क्लस्टर मध्ये 152 पदे आणि नागपूर क्लस्टर मध्ये 114 पदे सोलापुर क्लस्टर मध्ये 79 पदे अशी एकूण 2422 पदांची भरती होणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी योग्य उमेदवारांची निवड परीक्षाविना होणार आहे. यासाठी दहावीचे आयटीआय मार्क्स च्या आधारे मिरीट लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर क्लस्टर नुसार उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षा शुल्क सामान्य,ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.भारतीय रेल्वे मध्ये अर्ज करायचा असेल तर रेल्वे च्या अधिकृत साईड वर जाऊन अर्ज पूर्ण भरावा.अर्ज सोबत शुल्क भरणा करून अर्ज सबमिट करावा अर्जाची एक प्रत काढुन आपल्या कडे ठेवावी.

Leave a Comment

x