शेतकरी मित्रांनो 31 डिसेंबर पूर्वी प्रधानमंत्री फसल विमा काढा अन्यथा Pradhanmantri Fasal Vima

शेतकरी मित्रांनो 31 डिसेंबर पूर्वी प्रधानमंत्री फसल विमा काढा अन्यथा

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.सरकार शेतकरी पिकांसाठी संबंधित अनेक योजना राबवत आहे त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना.

या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास ही योजना शेतकऱ्यांना वेळेत उपयोगी पडते. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाने 31 डिसेंबर 2021 ही वेळ दिली आहे. जर शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2021 पूर्वी पिकाचा विमा काढला नाही तर त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसानन झाल्यास आर्थिक मदत मिळू शकणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी हे पीक विमा काढणे आवश्यक आहे. त्यानंतर विम्याचा लाभ मिळणार नाही .2020-21,2021-22 2022-23 आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीचे योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. पिकांना नैसर्गिक आपत्ती व इतर कोणत्याही धोक्याचा सामना करावा लागत असेल तर ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. विमा योजना चा लाभ घेण्यासाठी भारत सरकारच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.प्रमुख पिकांपैकी गहू बार्ली मसूर या पिकांसाठी 1.5 टक्के तर बटाटासाठी पाच टक्के प्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते तेव्हा त्याची अंमलबजावणी करणारी संस्था संबंधित बँक,शाखा आणि कृषी आणि संबंधित विभागाला 72 तासाच्या आत परिस्थितीच तपशिल द्यावा लागतो. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती चा धोका कमी करण्यासाठी 31 जानेवारी 2016 रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली होती. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दावा केला आहे की प्रीमियम म्हणून भरलेल्या प्रत्येक शंभर रुपये मागे शेतकऱ्यांना 537 रुपयांचा विक्रमी दावा मिळाला आहे.तेव्हा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा हा 31 डिसें 2021 पूर्वी भरा.

Leave a Comment

x