पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत वर्षाला मिळणार 42 हजार PM kisan mandhan yojana

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार 42 हजार रुपये

केंद्र सरकार पीएम किसान योजना(PM kisan yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्षी 6 हजार रुपये देते या योजनेचा 10 वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला आहे.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत वर्षाला मिळणार 42 हजार PM kisan mandhan yojana

नवीन वर्षामध्ये 10 व्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. वर्षातून तीन वेळा हे पैसे जमा होतात. ज्या शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी पीएम किसान योजनेच्या(PM kisan yojana) वेबसाईटवर जाऊन याबाबत चौकशी करता येईल आणि आपल्या अर्जाचे स्टेटस सुद्धा माहिती करून घेता येईल. पी एम किसान(PM kisan yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपये मिळतील अशी ही एक योजना सरकारने सुरू केली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये देणारी योजना सुरू केली आहे.त्यानुसार वर्षाला या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 36 हजार रुपये मिळतात.शिवाय पी एम किसान योजनेचे वर्षाला 6 हजार रुपये मिळून तुम्हाला वर्षाला 42 हजार रुपये मिळू शकतात.मात्र यासाठी सरकारच्या काही अटींची पूर्तता करावी लागेल त्या योजनेचे नाव आहे पी एम किसान मानधन योजना(PM kisan mandhan yojana) ही योजना शेतकऱ्यांना निवृत्तीवेतनाच्या स्वरूपात दरमहा तीन हजार रुपये दिले जातील. या योजनेसाठी ज्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना वेगळी कोणतेही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही, कारण सरकारकडे शेतकऱ्यांचे सर्व माहिती जमा आहे.पी एम किसान योजना सध्या मिळत असलेला लाभा सोबतच निवृत्तिवेतन स्वीकारण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही वेगळे पैसे जमा करण्याची गरज राहत नाही. या निवृत्तीवेतनाच्या योजनेचा हप्ता आपोआप पीएम किसान योजनेतून कपात होतो.

See also  नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र 2021 Nrega Job Card List 2021

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

1 निवृत्तीवेतनाच्या योजनेसाठी पात्र होण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्षे असायला पाहिजे
2 तसेच त्याच्या नावावर दोन हेक्‍टरपर्यंत शेती असायला हवी
3 शेतकऱ्याच्या वयानुसार वीस ते चाळीस वर्षासाठी शेतकऱ्याला 55 रुपये दोनशे रुपये मासिक योगदान भरावे लागते
4 यानंतर हा शेतकरी साठ वर्षाच्या झाल्यानंतर त्याला दरमहा 3000 रुपये निवृत्तिवेतन मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x