या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची मदत
पीएम किसान सन्मान निधी(PM kisan samman yojana) च्या धर्तीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ(PM kisan FPO yojana) योजना सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची मदत PM kisan FPO yojana
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 15 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजने बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
पीएम फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन स्कीम(FPO) मध्ये देशभरातील शेतकऱ्यांना सरकारकडून नवीन कृषी आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ज्यामध्ये अकरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांची एक संस्था किंवा कंपनी बनवायची आहे. त्यानंतर सरकार कडून संस्थेला 15 लाख रुपयांची मदत दिली जाते ज्याद्वारे शेतकरी कृषी उपकरणे किंवा खते बियाणे किंवा औषधी शेतकरी खरेदी करू शकतात. पीएम फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन(PM kisan FPO yojana) या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम तुम्हाला www.enam.gov.in त्या पोर्टल वर तुमचे लॉगीन तयार करायचे आहे त्यानंतर योजनेसाठी अर्ज करू शकता. सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराची अधिकृत www.enam.gov.in वेबसाईट वर जा. होमपेजवर FPO या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर फॉर्म भरा त्यानंतर कॅप्शन कोड युजरनेम आणि पासवर्ड भरा आता तुमचे लॉगीन तयार होईल.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या www.enam.gov.in या वेबसाईटवर जा. होमपेजवर स्टेक होल्डर्स पर्यावर कर्सर नेल्यानंतर तुम्हाला fpo चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी च्या पर्याय वर क्लिक करा आणि नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा त्यानंतर त्यानंतर स्कॅन केलेले पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ अपलोड करा त्यानंतर सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.