म्हाडाच्या भरती परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल
म्हाडा(mhada) च्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये(timetable) पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 31 जानेवारीपासून ऑनलाइन सुरू होणार आहेत.
म्हाडाच्या भरती परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल mhada exam timetable update
565 पदासाठी ऑफलाईन(offline) होणारी परीक्षा आता ऑनलाईन(online) होणार आहे. 31 जानेवारी 2,3 7,8,9, फेब्रुवारी या सहा दिवसात परीक्षा घेण्यात येणार आहे.म्हाडा परीक्षेची जबाबदारी टीसीएस(TCS) कंपनीवर सोपवण्यात आलेली आहे.
TCS कंपनीला परीक्षा घेण्याचा अनुभव आहे या आधी जीए सॉफ्टवेअर कंपनी कडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडल्याचा कट रचला असल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे म्हाडा कडून घेण्यात येणारी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनी मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत.
ऑनलाइन परीक्षेचे प्रमाणपत्र हॉल तिकीट(Hall ticket) डाउनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov.in या संकेतस्थळावर 22 जानेवारीपासून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया सोयीचे ठरावी यासाठी म्हाडा अधिकृत संकेतस्थळावर 26 जानेवारीपासून एक मोक लिंक(moc link) उपलब्ध करून देण्यात आली आहे या लिंक द्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार आहे. ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे .म्हाडा ची 12 डिसेंबर ला होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्विट करून ही परीक्षा पुढे ढकलली होती विद्यार्थ्यांचे क्षमा मागत यांनी ही माहिती दिली असून त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला होता. माडाची परीक्षा सकाळच्या सत्रात 50 हजार विद्यार्थी तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.