महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2021
खाद्य विभाग महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्र रेशन कार्ड यादी 2021 ऑनलाईन जाहीर करण्यात आलेली आहे आता आपण घरच्या घरी महाफूड या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रेशन कार्ड यादीमध्ये आपले नाव तपासू शकता.
महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट 2021 Maharashtra Ration Card list 2021
रेशन कार्ड यादी मध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे कुठे ही न जाता, कोणत्याही सरकारी कार्यालयात भेट न देता आपण घरबसल्या शिधापत्रिका यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे बघू शकता. दरवर्षी महाराष्ट्र शासन रेशन कार्ड यादीतील नावे लाभार्थीच्या वयाच्या आधारे अद्यावत करतात. रेशन कार्ड हे राज्य सरकारने दिलेला अधिकृत दस्तऐवज आहे एपीएल रेशन कार्ड बीपीएल रेशन कार्ड रेशन कार्ड, अंतदोय अशी प्रत्येक राज्य सरकारतर्फे तीन प्रकारचे रेशनकार्ड दिले जातात.
दारिद्र्यरेषेच्या वर येणाऱ्या लोकांसाठी एपीएल रेशन कार्ड देण्यात येत आहे दारिद्र्यरेषेखालील राहणाऱ्या लोकांसाठी बीपीएल रेशन कार्ड जारी करण्यात आले आहे आणि जे लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी अंत्योदय रेशन कार्ड देण्यात आलेले आहे. धान्य खरेदी करण्यासाठी जे पात्र आहेत त्यांना सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात धान्य उपलब्ध करून दिली जाते. ज्या लोकांना अद्याप रेशन कार्ड मिळाले नाही ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. परंतु ऑनलाईन अर्ज करीत असताना आपण त्यासाठी पात्र आहोत किंवा नाही हे तुम्हाला बघावे लागेल.
महाराष्ट्रातील रेशन कार्ड चे प्रकार
एपीएल रेशन कार्ड दारिद्र्यरेषेच्या वर येणाऱ्या सर्व लोकांना हे रेशनकार्ड देण्यात येते वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे हे रेशन कार्ड पांढऱ्या रंगाचे आहे.
बीपीएल रेशनकार्ड दारिद्र रेषेखालील येणाऱ्या सर्व लोकांना बीपीएल रेशन कार्ड दिले जाते बीपीएल रेशन कार्ड मिळवण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न 15 हजार ते एक लाख दरम्यान असावे हे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचे आहे.
अंत्योदय रेशन कार्ड अत्यंत गरीब असलेल्या सर्वांना अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते हे रेशन कार्ड केसरी रंगाचे असते जे लोक आपला उदरनिर्वाह योग्यरित्या करू शकत नाही त्यांना हे कार्ड दिले जाते.
रेशन कार्ड चे फायदे रेशन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून आपण करू शकतो. हे एक शासकीय दस्त ऐवज आहे ज्यात तांदूळ गहू साखर केरोसीन अनुदानाची खाद्य सामग्री महाराष्ट्रातील नागरिकांना सवलतीच्या दरात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत उपलब्ध करून दिले जाते.
शिधापत्रिका अर्जदाराला अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन जिल्ह्यानिहाय आणि नवीन रेशन कार्ड यादी डाऊनलोड करू शकतात.एपीएल बीपीएल रेशन कार्ड मुळे राज्यातील लोकांना अल्पदरात खाद्यपदार्थ मिळते जेणेकरून त्यांचा आर्थिक भार कमी होऊ शकेल.
रेशन कार्ड काढण्यासाठी डॉक्युमेंट
आधार कार्ड, पॅन कार्ड व उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, गॅस कनेक्शन असल्यास मोबाईल नंबर रेशन कार्ड 2021ऑनलाइन कसे पहावे तुम्हाला जर तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन Maharashtra Ration Card List 2021 पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाफूड या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपले ऑनलाईन रेशन कार्ड पाहू शकता