जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात Land Government Rates

जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात

आपल्याकडे जर पैसा असेल तर आपण गुंतवणूक करतोच.पण ही गुंतवणूक कोठे करावी हा मोठा प्रश्न आज काळाच्या ओघात शेत जमिनीचे दर झपाट्याने वाढत आहेत, तरीसुद्धा नागरिक स्थावर मालमत्ता म्हणून जमिनीमध्ये अधिक पैसे गुंतवत आहेत.

जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात Land Government Rates

जमिनीचे दिवसेंदिवस भाव हे वाढतच आहेत योग्य ठिकाणी गुंतवणूक व्हावे यासाठी आपण जमीन विकत घेतो. पण शेत जमीन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत हे माहित असणे गरजेचे असते. जर आपणास शासकीय दराचे माहिती असली तर जमिनीचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज बांधता येतो ज्यामुळे योग्य ठिकाणी योग्य दरामध्ये आपण जमीन खरेदी करू शकतो. काळाच्या ओघात सर्व काही डिजिटल झाले आहे शेत जमिनीचे सर्व डॉक्युमेंट्स ही आता ऑनलाइन द्वारे काढता येतात. तशाच प्रकारे आपल्याला जर जमिनीचा सरकारी दर पाहायचा असेल तर त्याची सुद्धा प्रक्रिया आहे चला तर जाणून घेऊया जमिनीचे दर कसे ठरविले जातात.
Land Government Rates

1) जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगल वेबसाईटवर जाऊन तेथे असलेल्या सर्च बार मध्ये igrmaharashtra.gov.in टाइप करावे.
2 महाराष्ट्र शासनाचे नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे वेबसाइट सुरु होईल त्याच्या डाव्या कोपऱ्यात वेगवेगळे तीन व त्याचे टॅब दिसतील त्यापैकी महत्वाचे दुवे असे लिहिलेले टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
3 त्यानंतर मूल्यांकन या पर्यायावर क्लिक करा बाजार मूल्य दर पत्रक नावाचे पेज ओपन होईल या पेज वर महाराष्ट्राचा नकाशा दिसेल त्यामध्ये आपल्याला ज्या जमिनीचे सरकारी भाव पायचा आहे तो जिल्हा निवडावा.
4 कोणत्या वर्षामध्ये किती भाव या पर्यायावर क्लिक करून आपल्याला कोणत्या वर्षात काय भाव होता याची देखील जाणीव होईल.
5 जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचे सरकारी भाव काय आहे याची माहिती समोर येईल यामध्ये जे भाव दिलेले असतात ते हेक्टर मध्ये असतात त्यानुसार एकरी काय भाव आहे याचा अंदाज बांधता येईल

वरील प्रक्रिया जमिनीचे सरकारी दर काय असतात याची माहिती तर मिळेलच पण जिरायत जमीन बागायती जमीन तसेच एमआयडीसी अंतर्गत येणारी जमीन राष्ट्रीय महामार्गालगत येणारे जमीन त्यानुसार त्याचे दर हे ठरविण्यात येतात. त्यामुळे सध्याचे मूल्य मूल्य आणि सरकारी दर काय याची माहिती झाली तर जमिनीची नेमके भाव काय राहणार याचा अंदाज बांधता येणार आहे.

Leave a Comment

x