कृषी यांत्रिकीकरण योजना
महाराष्ट्र सरकारने नुकतेच कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 नुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उपकरणावर 80 टक्के पर्यंत अनुदान देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजना Krishi Yantritikaran Yojana
कृषी यांत्रिकीकरण म्हणजे जेथे शक्य असेल तेथे यांत्रिकीकरण हा द्वारे प्राणी आणि मानवी शक्तीचा पुनर्स्थापना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरवल्या जातात. त्यानुसार शेतकरी किमतीत जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतील. कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 अंतर्गत ट्रॅक्टर श्रेडर उडणारी फॅन औषधफवारणी पंप, डस्टर सिंचनपम्प सुविधा ग्रामीण बँकेमार्फत पुरविल्या जातात.
मिशन ओन अग्रिकल्चर मेकॅनायझेशन योजने द्वारे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 नुसार 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
1 शेतकऱ्यांचे आधार कार्ड
2 बँकेचे पासबुक
3 सातबारा आणि गाव नमुना आठ
4 जे यंत्र खरेदी केलेले आहे त्याचे ओरिजनल बिल
5 जर ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या नावावर असेल तर त्याला अनुदान मिळेल
पात्रता
1 शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
2 शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी
3 अर्जदार जर अनुसूचित जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल krishi.maharashtra.gov.in