मोबाईल डेटा नेहमी चालू ठेवा जाणून घ्या फायदे keep mobile data always active

मोबाईल डेटा नेहमी चालू ठेवा जाणून घ्या फायदे

आजकाल प्रत्येक जण हा स्मार्टफोन मध्ये व्यस्त झाला आहे. ऑनलाईन शिक्षण असेल, ऑनलाईन गेम्स, ऑडिओ, व्हिडिओ,वर्क फ्रॉम होम ची कामे परंतु या सर्व गोष्टींसाठी मोबाईल डेटा असणे आवश्यक आहे. कारण डेटानसेल तर स्मार्टफोन असण्याचा काही उपयोग होत नाही. बरेच लोक मोबाईल मध्ये डेटा काही मर्यादित रिचार्ज करतात,तर काही मोठे रिचार्ज करतात काम नसेल तर मोबाईल डेटा बंद करून ठेवतात.आपल्याला माहीतच आहे की मोबाईलचा उपयोग होत नसेल तर आपण डेटा बंद करून ठेवतो परंतु हा डेटा जर सुरू ठेवला तर त्याचे फायदे सुद्धा आहेत.

मोबाईल डेटा नेहमी चालू ठेवा जाणून घ्या फायदे keep mobile data always active

1) मोबाईल डाटा चालू ठेवण्याचा फायदा म्हणजे आपल्याला फोनचे लोकेशन कडू शकते आपण जर गर्दीच्या ठिकाणी असाल आणि आपला डाटा चालू ठेवला तर हरवलेला फोन फोनचे लोकेशन आपण ट्रॅक करू शकाल. गुगल वर जाऊन ट्रॅक माय फोन असा करू शकता जे आपल्याला फोनचे लोकेशन सहजपणे ट्रॅक करेल आणि आपला फोन कुठे आहे आपल्याला सहजपणे माहिती होईल.

2) जेव्हा आपल्या फोनचा डेटा चालू असतो तेव्हा फोन मध्ये असलेले सर्व एप्स काम करीत असतात जेव्हा कोणतीही नवीन माहिती किंवा बातमी येते तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येत राहतात.

3) बऱ्याच वेळेस फोन मध्ये नेटवर्क नसते आणि इतर लोक आपल्याशी संपर्क साधू शकत नाहीत. Keep mobile data always active परंतु बऱ्याच वेळा असे घडते की जेव्हा लोक सामान्य कॉलिंग न करता वेब कॉलिंग करतात तेव्हा ते सहज तुमच्याशी संपर्क साधू शकतात.

4) डेटा सुरू असल्याने ट्रूकॉलर पूर्णपणे सक्रिय राहतो त्यामुळे कोल कोणत्या व्यक्तीकडून येत आहे आपल्याला कळेल.

5) मोबाईल डाटा चालू ठेवण्याचा एक फायदा हा आहे की आपल्या फोनमध्ये आपल्याकडे अँटीव्हायरस ऍप्स असल्यास डेटा चालू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्हायरस आपल्या फोन मध्ये येत नाही तसेच आपला फोन देखील आपोआप अपडेट केला जाईल. आपण दिवसभर आपले इंटरनेट डेटा सुरू ठेवू शकता, परंतु रात्री डेटा बंद करणे योग्य राहील.

Leave a Comment

x