आंतरराष्ट्रीय युवा दिन 2021 International Youth Day 2021

आंतरराष्ट्रीय युवा दिन 2021

12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सदर माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. युवा दिन जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो. युवा वर्ग हा खूप मोठ्या संख्येने असून या वर्गाला योग्य असे शैक्षणिक,मानसिक,शारीरिक आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन व्हावे.

आंतरराष्ट्रीय युवा दिन 2021 International Youth Day 2021

युवावर्ग अतिसंवेदनशील असल्यामुळे या युवा वर्गाला मार्गदर्शन,माहितीच्या आधारे आरोग्य विषयक जनजागृती व्हावी. आपल्याला माहीतच आहे की काही असे आजार आहेत की ज्याचे जनजागृती हे प्रभावी माध्यम आहे. होय आपण जाणून घेऊया या hiv/एड्स आजाराविषयी. यावर्षीचे युवादिनाचे घोषवाक्य आहे.” जागतिक घडामोडी मध्ये युवकांची प्रतिबद्धता/ सहभाग”

एचआयव्ही-एड्स वर्तमान काळातील सर्वात मोठी स्वास्थ समस्यांपैकी एक आहे. लाल रंगाचे फीत या रोगाबाबत च्या जनजागृतीचे प्रतिनिधिक चिन्ह आहे. एच आय व्ही संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. हा रोग 1980च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. एच आय व्ही ची लागण कशी होते,त्याची लक्षणे कोणती याबाबत प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येते. एच आय व्ही एड्स यामधील फरक काय? तो कसा टाळता येईल? तपासणी कोठे करावी? एच आय व्ही यावर औषध आहे का? एच आय व्ही स्टेटस का जाणून घ्यावा. या प्रश्नां संबंधी युवा वर्गामध्ये अनेक प्रश्न असतील प्रश्नांची उत्तरे जाणून युवा वर्गाची भुमिका,सहभाग जाणून घेऊया.

एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनी डेफिशियनसी व्हायरस म्हणजे मानवी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती चा ऱ्हास करणारा विषाणू म्हणजेच एच.आय.व्ही आणि एड्स म्हणजे अकवायर्ड इम्युनी डेफिशियनसी सिंड्रोम म्हणजेच मानवी शरीरातील संपादित रोग लक्षणांचा समूह म्हणजे एड्स. हा आहे एच आय व्ही आणि एड्स मधला फरक.

एच.आय.व्ही/एड्स कसा पसरतो व तो कसा टाळाल

एच. आय.व्ही प्रसाराची चार माध्यमे आहेत.

1.एच.आय.व्ही संसर्गित वक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने एचआयव्हीचा प्रसार होतो. 2)एच.आय.व्ही संसर्गित रक्त घेतल्यामुळे किंवा वापरामुळे
3) एच आय व्ही सांसर्गित सुई अथवा सिरिंज चा वापर केल्याने
4) एचआयव्ही संसर्गित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला एच आय व्ही चा संसर्ग होणे

संसर्ग टाळायचा असेल तर सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे गरजेचे.मान्यताप्राप्त सरकारी रक्तपेढीतिलच रक्त वापरणे. प्रत्येक वेळी नवीन सुई व सिरीनज चा वापर करणे. गरोदर माता असल्यास व वैद्यकीय सल्ला घेऊन एच आय व्ही व इतर तपासण्या करणे. संयम ठेवणे व एकाच साथीदाराची एकनिष्ठ राहणे. एच आय व्ही एड्स या विषयी जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे.

एच आय व्ही तपासणी कधी करावी व कुठे?

1) एकापेक्षा अधिक व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध आले असतील तर
2) क्षयरोगाची म्हणजेच टीबीची लागण झाली असेल तर
3)गुप्त रोग झाला असेल तर
4) दूषित किंवा एच आय व्ही संसर्गित व्यक्तीची सुई किंवा सिरीजचा वापर केला असेल
5) नागिन चा आजार झाला असेल तर
6)तसेच युवा वर्गाने लग्नापूर्वी युवक-युवती यांनी एचआयव्ही तपासणी करून घ्यावी

एचआयव्ही तपासणी कोठे करावी?

सरकारी रुग्णालयातील सर्व एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रामध्ये एचआयव्ही तपासणी मोफत करण्यात येते. केंद्रामध्ये आपले समुपदेशन करण्यात येऊन सर्व प्रकारची गोपनीयता पाळली जाते आणि गरजेप्रमाणे संदर्भ सेवा सुद्धा दिल्या जातात.

एच.आय. व्ही. स्थिती Hiv Status का जाणून घ्यावी ?

एच आय व्ही ची स्थिती जाणून घेणे म्हणजे स्वतःची एचआयव्ही तपासणी करून तपासणीचा निष्कर्ष सकारात्मक म्हणजे hiv+ पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक म्हणजे hiv- निगेटिव माहित असणे म्हणजे हे स्थिती जाणून घेणे होय. एच आय व्ही स्थिती जाणून घेण्यासाठी स्वतःची व जोडीदाराची एच आय व्ही तपासणी करून घेणे आवश्यक आहे याचे कारण जर एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीचा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीला याची तपासणी शिवाय इतर कुठल्याही लक्षणावरून किंवा व्यक्तीच्या दिसण्यावरून हे कळणार नाही. त्याकरिता सर्वांनी स्वतः तपासणी करून आपली स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. hiv तपासणी सकारात्मक आल्यास संसर्ग असलेल्या व्यक्तींना मोफत औषधोपचार देण्यात येतो ए. आर. टी.(ART) औषधाचे महत्त्व म्हणजे ए. आर. टी औषध नियमित घेतल्यास ने व्यक्तीचे आयुष्यमान वाढते. टीबी इतर संधीसाधू आजार लवकर होत नाही. एकच गोडी आयुष्यभर. आरटी औषधाच्या मदतीने एच आय व्ही संसर्गित व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतो.

रेड रिबन क्लब एक महाविद्यालयीन चळवळ

रेड रिबन क्लब म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थी/ विद्यार्थ्यांना लैंगिक आजाराविषयी योग्य माहिती देऊन त्यांच्यामार्फत महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यां मध्ये जनजागृती पर माहिती पोहोचण्यासाठी स्थापन केलेला गट म्हणजे रेड रिब्न क्लब होय. तरुणांमधील 15 ते 29 वर्षे वयोगट एच आय व्ही एड्स संसर्गासाठी जास्त संवेदनशील मानला जातो. या वयात मानसिक व सामाजिक स्थिती ही संवेदनशील असल्या कारणाने लैंगिकतेविषयी कुतूहल निर्माण करते. याशिवाय एचआयव्ही एड्स विषयी योग्य माहितीचा अभाव व जीवन कौशल्य आत्मसात करण्याच्या मर्यादेत क्षमतेमुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. रेड रिबन क्लब द्वारा केंद्रित केलेल्या युवकांना सुरक्षित आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. रेड रिबन क्लब युवकांना आय एच आय व्ही/ एड्स विषयी माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन व दिशा दाखविते तसेच त्यांना सुरक्षित लैंगिक वर्तन, रक्तदानासाठी प्रेरित करण्यात येते. क्लबच्या माध्यमातून महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी याच्या विषयी संपूर्ण माहिती घेऊन माहितीच्या आधारे समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, तसेच जनजागृतीपर माहिती सत्र, आयोजित करणे तसेच जनजागृती पर प्रभात फेरी समूह चर्चा आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय एड्स निशुल्क हेल्पलाइन नंबर

एच आय व्ही एड्स बद्दल योग्य व परिपूर्ण माहिती साठी खालील टोल फ्री क्रमांक नंबर वर कॉल करा 10 97 माहिती सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे.

एचआयव्ही/एड्स-युवकाची भूमिका, सहभाग

1)युवा वर्ग अति संवेदनशील असल्याने स्वतःची एच. आय. व्ही स्थिती जाणून इतरांना स्थिती जाणून घेण्यास प्रोत्साहित करणे.
2) आजाराविषयी परिपूर्ण माहिती घेऊन जनजागृती माध्यम म्हणून युवावर्गाने आरोग्यविषयक समाज जनजागृती करावी.
3) रेड रिबन क्लब मध्ये सहभाग नोंदवून एचआयव्ही-एड्स आळा घालण्यासाठी चर्चासत्रे, प्रभात फेरी,निबंध स्पर्धा,पोस्टर प्रदर्शनी,सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप या माध्यमातून जनजागृती करावी.
4)प्रत्येक गरोदर मातेने एच आय व्ही तपासणी व इतर तपासण्या कराव्यात यासाठी विद्यार्थिनींनी समाज जनजागृती करावी.
5) युवा या नात्याने लग्नापूर्वी प्रत्येक युवक-युवती यांनी एचआयव्ही तपासणी करावी
6)कोणतीही एच आय व्ही सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारा पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
7) युवा वर्गाने आपल्या सहवासातील इतर व्यक्तींना एच आय व्ही संबंधित माहिती देण्यास मदत करावी.

Leave a Comment

x